सर्च रिसर्च : पारदर्शी लाकडाची किमया 

Transparent-wood
Transparent-wood

तुमच्या घराच्या खिडक्यांना लावलेल्या काच किंवा मोबाईलला असलेला पडदा (स्क्रीन) भविष्यात लाकडाच्या साहित्याने बदलला गेल्यास आश्चर्य वाटायला नको. अर्थात हे लाकूड पारदर्शी असेल. हो हो पारदर्शी लाकूड ही विज्ञान कथेतील किंवा एखाद्या विज्ञानविषयक चित्रपटातील कल्पना नाहीये. पारदर्शी लाकूड प्रत्यक्षात तयार करण्यात आले आहे. 

मेरिलँड आणि कोलरॅडो विद्यापीठातील संशोधकांनी पारदर्शी लाकूड तयार करण्यात यश मिळविले आहे. हे पारदर्शी लाकूड काचेपेक्षा पाचपट जास्त टणक आणि काचेपेक्षा पाचपट अधिक उष्णतारोधी असल्याचा दावा करण्यात आला आहे. काचेप्रमाणे याचे तुकडेही पडणार नाहीत, त्यामुळे खिडक्यांना हे पारदर्शी लाकूड सहजपणे लावता येऊ शकणार आहे. 

जर्नल ऑफ अॅडव्हान्स्ड फंक्शनल मटेरिअल्स या नियतकालिकात यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या वेबसाईटवर या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुनयोंग झोऊ यांच्या नेतृत्वाखालील संघाने हे संशोधन केले आहे. 

कसा केला प्रयोग? 
बाल्सा झाडाच्या लाकडाचा उपयोग यासाठी संशोधकांनी केला. बाल्साचा वृक्ष मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश शोषून घेतो. तसेच हा वेगाने वाढतो. त्याची वाढ ३० मीटर उंचीपर्यंत असू शकते. विविध प्रकारची प्रारुपे तयार करण्यासाठी, एरो मॉडेलिंग, पॅकिंग, फ्लोट, राफ्ट तयार करण्यासाठी हे लाकूड मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. तसेच शिल्पकलेसाठीही हे वापरले जाते. या लाकडाचे सर्वसाधारण तापमानाला ऑक्सिडेशन करण्यात आले. हे एक प्रकारचे ब्लिचिंग सोल्युशन होते. प्रकाशाला शोषून घेणारे लाकडातील तत्त्व नष्ट होण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यावर पॉलिविनायल अल्कोहोलमध्ये (पीव्हीए) बुडवून ठेवण्यात आले. त्यामुळे ते पारदर्शी होऊ शकले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काचेच्या तुलनेत उपयोग 
पारदर्शी लाकूड हे काचेपेक्षा पाचपटींनी अधिक उष्णता ते शोषून घेऊ शकते. तसेच हे पारदर्षी लाकूड काचेपेक्षा अधिक टिकाऊ आणि वजनाला हलकेही आहे. पीव्हीएचा वापर करण्यात आला असल्याने ही नव्याने तयार झालेली काच आपल्याला हवी तशी वाकवताही येऊ शकते. एखाद्या आघातने काचेचे बारीक तुकडे होतात. तसे या नव्या काचेचे होणार नाहीत, तर ती आघातानंतर फक्त वाकेल. त्यामुळे त्यापासून जखमी होण्याचा धोका कमी असतो. हरितगृहवायूंचे उत्सर्जन ही नवी काच रोखू शकेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

जगभरात काचेचे उत्पादन करताना मोठ्या प्रमाणावर ऊर्जा, लागते व साधारणतः २५ हजार टन कार्बनचे दरवर्षी उत्सर्जन होते. हे उत्सर्जन थांबवता येणे शक्य होऊ शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. 

घरातील खिडक्यांच्या काचेला पर्याय ठरण्याबरोबरच ऑटोमोटिव्ह उद्योग, मोबाईल उद्योग आणि इतर औद्योगिक उत्पादनांमध्ये या पारदर्शी लाकडाचा उपयोग करता येऊ शकेल, असा संशोधकांचा दावा आहे. म्हणजे अगदी स्मार्टफोनमध्येही याचा वापर करता येऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेमध्ये विविध इमारतींमधील तापमान नियंत्रित करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही अमेरिकेच्या एकूण ऊर्जा वापराच्या सुमारे १४ टक्के आहे. त्यापैकी एक चतुर्थांश ऊर्जा खिडक्यांच्या काचांमधून बाहेर जाऊन वाया जाते.संपूर्ण जगाचा विचार केली तर अशा प्रकारे ऊर्जा वापरली जाण्याचे आणि वाया जाण्याचे प्रमाण प्रचंड आहे. ही ऊर्जा वाचविण्यासाठी पारदर्शी लाकूड उपयोगी पडू शकेल, असे संशोधकांना वाटते. 

लाकूड पारदर्शी करण्याचा हा काही पहिलाच प्रयोग नव्हता, मात्र लाकडाला पूर्णपणे पारदर्शी याचवेळी करता येऊ शकले, असा दावा शास्त्रज्ञांचा आहे. हा प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला तर भविष्यात आपल्या दैनंदिन उपयोगातून काच हद्दपार झालेली असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com