
पांढऱ्या भातावर लोणच्याचा खार घालून तुम्ही कधी खाल्ला आहे? ज्यांनी हा स्वाद घेतला आहे त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले असणार. हा विषय निघण्याचे कारण अशाच एका लोणच्याच्या प्रकारावर हक्क नक्की कोणाचा, यावरून दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये चक्क वाद सुरू आहे. जर्मनीचे साउरक्राउट, भारताचे लोणचे, तसेच कोरियन लोकांचे किमिची. हा तिखट आंबवलेला पदार्थ कोरियाची राष्ट्रीय डिश आहे.
पांढऱ्या भातावर लोणच्याचा खार घालून तुम्ही कधी खाल्ला आहे? ज्यांनी हा स्वाद घेतला आहे त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले असणार. हा विषय निघण्याचे कारण अशाच एका लोणच्याच्या प्रकारावर हक्क नक्की कोणाचा, यावरून दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये चक्क वाद सुरू आहे. जर्मनीचे साउरक्राउट, भारताचे लोणचे, तसेच कोरियन लोकांचे किमिची. हा तिखट आंबवलेला पदार्थ कोरियाची राष्ट्रीय डिश आहे. मात्र, चीनने किमिची म्हणजे आमच्या पाव काईचीच रेसिपी असल्याचे सांगत या डिशवर दावा सांगितला आणि वादाला तोंड फुटले. दक्षिण कोरिया व चीनमध्ये ‘भात घशाखाली उतरण्यासाठीचा पदार्थ’ अशी ओळख असलेला हा पदार्थ त्यामुळे दोन्ही देशांतील लोकांच्या घशात अडकला आहे...
हा सगळा वाद झाला स्वित्झर्लंडमधील ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅंर्डडायझेशन’ (आयएसओ)ने सिचुआन प्रांतातील ‘पाव काई’ या लोणच्याला मान्यता दिल्यानंतर. चीनने पाव काई आणि किमिची हे एकच पदार्थ असल्याचे सांगत त्यावरही दावा सांगितला. कोरियाने हे दोन्ही पदार्थ पूर्णपणे वेगळे असल्याचे सांगत चीनचा दावा फेटाळला. किमिची हा दक्षिण कोरियातील जेवणाचा अविभाज्य भाग असल्याने कोरियन नागरिकांनी चिनी लोक आमची डिश चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. या किमिची युद्धाला आता चांगलीच धार चढली आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ कोरिअन स्टडिज’चे डॉ. सोजीन लीम यांच्या मते, ‘‘कोरियाची किमिची ही डिश चीनमध्ये पाव काई नावाने सर्व्ह केली जाते आणि चीनची याच नावाची आणखी एक वेगळी डिश असल्याने गोंधळात भर पडली आहे. किमिची म्हणजे वेगवेगळे तिखट मसाले घालून आंबवलेला कोबी, तर पाव काई म्हणजे अनेक भाज्यांचे लोणचे. हा पदार्थ चवीच्या बाबतीत किमिचीपेक्षा खूप वेगळा आहे. मात्र, चिनी लोक किमिचीचे मूळ पाव काईमध्येच असल्याचा दावा करीत आहेत.’
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
न्यूयॉर्कमधील कोरियन रेस्टॉरंटचे एक्झिक्युटिव्ह शेफ सुयाँग पार्क यांच्या मते,‘‘ किमिचीच्या मुळाबद्दल कोणताही वाद होण्याचे कारण नाही. ती गेली हजार वर्षे कोरियन जेवणाचा अविभाज्य भाग आहे. कडक थंडीच्या काळात लोक भुकेने मरू नयेत म्हणून भाज्या आंबवून साठवण्याची प्रथा सुरू झाली होती. ती डिश आता कोरियन डायनिंग टेबलावरचा अविभाज्य भाग आहे.’’ या विषयाचे आणखी एक अभ्यासक फुशिया डनलॉप यांच्या मते, ‘‘पाव काई म्हणजे फक्त भाज्यांचे मिठाच्या पाण्यातले लोणचे. किमिचीमध्ये मिरची, आंबलेले सी-फूडही असते, जे सिचुआन प्रांतातील पाव काईमध्ये नसते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सिचुआनमध्ये जेवताना भाताबरोबर कोणत्याही ऋतूत हे कोबीचे लोणचे दिसतेच. या लोणच्याचे काम भात घशाखाली उतरवणे हेच असते.’ क्लारेसिया वेई या तैवानमधील पत्रकाराने सिचुआन प्रांताला भेट दिली होती. त्यांच्या निरीक्षणानुसार, ‘‘पाव काईमध्ये मिठाचे पाणी व मसाले असतात, तर कामिचीमध्ये कोबीला मीठ चोळून त्याच्याच पाण्यात मुरवून लोणचे घातले जाते.
पाव काईमध्ये खडा मसाला घातला जातो आणि भाज्या पूर्णपणे मुरवल्या जात नाहीत.’’ मग चीन त्यावर दावा का सांगतोय, यावर डनलॉप म्हणतात, ‘‘चीनला आपणच पहिले आहोत, असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो. खरेतर जगातील सर्वच संस्कृतीत लोणची घालण्याची परंपरा असल्याने कोणीही त्यावर दावा करणे चुकीचेच आहे. ‘युनेस्को’, दक्षिण कोरियासह जगातील अनेक देश किमिची हा कोरियाचा पदार्थ आहे असा दावा करीत असले, तरी ही लढाई चीनच जिंकण्याची शक्यता आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द गार्डियन’, ‘रॉयटर्स’ आणि जगातील इतर सर्वच विख्यात वृत्तसंस्थांनी हा विषय लावून धरला आहे. ‘गुगल सर्च’मध्ये हा पदार्थ पहिल्या पाच सर्चमध्ये आला आहे. सिचुआन प्रांताने पाव काईची प्रसिद्धी करण्यात मोठी आघाडी घेतली आहे.’’
किमिची आणि पाव कोई हे लोणच्याचे प्रकार या वादामुळे चर्चेत आले, हे मात्र नक्की...
Edited By - Prashant Patil