sea water green house
sea water green house

सर्च-रिसर्च : सागरी जलाची वाळवंटातील किमया 

कोरोना महामारीच्या काळात आपण अन्नपदार्थांच्या तुटवड्याचा अनुभव घेतला. मात्र, जगातील मोठ्या लोकसंख्येला हा सामना कायमच करावा लागतो. वाढती लोकसंख्या व पाण्याच्या दुर्भिक्षामुळे परिस्थिती अधिक बिकट बनते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, २०२५पर्यंत जगातील अर्ध्या लोकसंख्येला पिण्यायोग्य पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. संशोधकांच्या मते, समुद्राच्या पाण्यापासून बनवलेली हरितगृहे (सी-वॉटर ग्रीनहाउस) यावरचा उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात. ओमान, संयुक्त अरब अमिराती व ऑस्ट्रेलियात गेल्या दहा वर्षांत झालेल्या संशोधनावरून हा भविष्यातील पाण्याच्या समस्येवरचा उपाय म्हणून समोर येत आहे.

ब्रिटनमधील संशोधक आणि ‘सी-वॉटर ग्रीनहाउस’चे संस्थापक चार्ली पाटोन यांच्या मते, ‘पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात आहे, मात्र आपण त्याचा योग्य वापर करीत नाही. समुद्राचे पाणी आणि मुबलक सूर्यप्रकाश असल्यास आपण निबिड वाळवंटातही धान्य पिकवू शकतो.’ पाटोन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ओमान, युएई व ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यांजवळील वाळवंटात ‘मृगजळ’ उभारले आहेत. यासाठी त्यांनी थेट समुद्रातून पाइपद्वारे पाणी विहिरींमध्ये आणले व त्यापासून सौरऊर्जेवर चालणारी हरितगृहे बनवली. येथे तुम्हाला पोलादी जाळ्या व गवत, कागदाच्या मदतीने तयार केलेल्या इमारती दिसतील. आतमध्ये रसरशीत काकड्या, टोमॅटो व रास्पबेरी पाहायला मिळतील. जॉर्डनमध्ये अक्वाबाच्या वाळवंटात लाल समुद्रापासून १५ किलोमीटर अंतरावर चार फुटबॉलच्या मैदानांच्या आकाराचे समुद्राच्या पाण्यावर काम करणारे हरितगृह उभारले गेले व ते २०१७मध्ये चर्चेत आले. या प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक केजेटील स्टेक म्हणतात, ‘पृथ्वीवर खारेपाणी, सूर्यप्रकाश व वाळवंट मुबलक असून, आपण त्याचा उपयोग अन्न, पाणी व स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीसाठी केला पाहिजे. जगातील ८० टक्के शुद्ध पाणी शेतीसाठी वापरले जाते. जगाची लोकसंख्या २०५०मध्ये १०अब्ज होईल, तेव्हा आपण पर्यावरणाला हानी न पोचवता अन्नाची निर्मिती कशी करणार आहोत?’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘या ग्रीनहाउसमध्ये थंड हवा व आर्द्रता राखली जाते. त्यातून समुद्राच्या पाण्यावर भाज्या व फळे पिकवली जातात व पाण्याचा पुनर्वापरही केला जातो. ही शेती वाढत असतात पाने व फुलांमधील पाण्याचे बाष्पीभवन होते. हवा उष्ण व कोरडी असल्यास अधिक बाष्पीभवन होते, मात्र ती ब्रिटनप्रमाणे ढगाळ असल्यास अगदी कमी बाष्पीभवन होते. त्यामुळे या हरितगृहामध्ये ब्रिटनप्रमाणे वातावरण निर्माण करणे गरजेचे ठरते. हे ‘पॅड आणि फॅन’ तंत्राच्या मदतीने साध्य केले जाते. घड्या घातलेल्या व ओल्या केलेल्या जाड कागदाच्या थरामधून पंख्यांच्या मदतीने जोरदार हवेचा झोत सोडला जातो. यातून तयार झालेल्या वाफेतून हरितगृहामधील आर्द्रता वाढते व तापमान १५अंश सेल्सिअस होते. सामान्य हरितगृहांमध्ये गोडे पाणी वापरले जाते, तर येथे समुद्राचे पाणी. पॅडमधून पाणी पुढे फेकले जाताना त्यातील क्षार वेगळे होतात आणि हे ‘ब्राईन’ नावाचे खारे पाणी हरितगृह थंड करण्यासाठी वापरतात. ब्राईनचा उत्कलन व गोठणबिंदू अधिक असल्याने ‘कुलंट’ म्हणून ते अधिक चांगले काम करते. वाफेचे घनीभवन होताना तयार झालेले शुद्ध पाणी हरितगृहातील पिकांना मिळते व लोकांना पिण्यासाठीही वापरता येते, असे पाटोन सांगतात.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हे मॉडेल सहारा फॉरेस्ट प्रोजेक्‍टमध्ये यशस्वीरीत्या राबवले गेले आहे. समुद्राच्या पाण्यापासून हरितगृह बनविण्याचा आणखी फायदा लिथिअम, कोबाल्ट व मॅग्नेशिअम या खनिजांची निर्मिती. समुद्राच्या पाण्याची हरितगृहासाठी वाफ करताच आपल्याला त्यापासून लिथिअम बाहेर काढणे सोपे जाते. अशा प्रकारे प्रकल्पातून हरित नोकऱ्यांची निर्मितीही होईल व गरीब देशांना भाजीपाला आयातीची गरजही पडणार नाही. भारतात गुजरात व राजस्थानमध्ये अशी वाळवंटे आहेत व तेथेही या तंत्राद्वारे भाजीपाला पिकवणे सहज शक्‍य आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com