
अरविंद व्यं. गोखले
लोकमान्य टिळकांची अनेक भाषणे ‘समग्र लोकमान्य टिळक’ या ग्रंथात घेतलेली आहेत, ती सरकारी गुप्त नोंदींमधून. ती अभिलेखागारात सुरक्षित आहेत; पण असा कितीतरी दस्तावेज अजूनही बाहेर येऊ शकलेला नाही. तो यायला हवा. अशा अभ्यासातून कितीतरी नवीन गोष्टींवर प्रकाश पडतो.