

A Humorous Take on the Modi-Meloni Diplomatic Meet
Sakal
रोममध्ये गेल्यावर रोमनांसारखे वागावे, असे एक (बहुधा) संस्कृत वचन आहे. -रोमदेशे गत्वा रोमजनाचरणं आचरेत!! पूर्वी मी हिमालयात हिंडत होतो, तेव्हाच मला रोमरिटर्न साधूने हे जीवनविषयक गुह्य एका गुहेत बसून सांगितले होते. रोमच्या विमानतळावर उतरलो, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले. भारतात अंगावर काटा येतो. रोममध्ये रोमांच येतात. माय डिअर फ्रेंड सुश्री जोर्जियाबेन मेलोनी वेलकोम करायला आलेल्या होत्या. त्यांनी ‘वेलकोम टु रोम, माय डिअर फ्रेंड मोडी’ असा संदेस पाठवलाच होता.