

The satire uses witty references to Prime Minister Narendra Modi and contemporary political developments while highlighting the theme of public service.
Sakal
आजची तिथी : श्रीपराभव नाम संवत्सर श्रीशके १९४८ आषाढ शु. नवमी.
आजचा वार : बुध्दिवार.
आजचा सुविचार : धन्य भाग सेवा का अवसर पाया...पाऽऽया!
न मो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः (१०८ वेळा लिहिणे.) एरवीही मी खूप लौकर उठतो. पण आजचा दिवस स्पेशल आहे. उठल्यावर लागलीच उशाशी ठेवलेला फोन उघडला. हरखूनच गेलो. कारण साक्षात वंदनीय श्री मोदीजींचा मेसेज आलेला होता. रात्री बरोब्बर बारा वाजून तीन मिनिटांनी त्यांनी मेसेज पाठवला होता. (मी लौकर झोपतो.) ‘‘तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार...अब तक छप्पन, फोर्टिफोर टु गो! आज के शुभ अवसरपर सिंहावलोकन किजिए...हॅप्पीवाला बर्थ डे!’’ खरे सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी आले. आपल्या शिष्यांची ते कित्ती काळजी करतात! नमो नमः!! रात्री बारापर्यंत जागून त्यांनी मला मेसेज केला. मी भरून पावलो! या एका मेसेज साठी मी दर वर्षी छप्पन वर्षांचा व्हायला तयार आहे...
थोड्या वेळाने आमचे ठाण्याचे सन्मित्र कर्मवीर भाईसाहेब शिंदे यांनी मेसेज पाठवला. त्यात म्हटले होते, ‘‘आदरणीय मोटाभाईंनी मला त्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देण्यास सांगितले आहे. कधी येऊ? कळवा!’’ मन थोडे आंबट झाले. मोटाभाई मला थेट शुभेच्छा देऊ शकले असते. पण हल्ली ते कर्मवीरांच्या माध्यमातूनच बोलतात. काय करावे कळत नाही. जाऊ दे! जोवर महाशक्ती आपल्या पाठीशी आहे, तोवर चिंता करायची गरज नाही.