देखणे जे हात...

‘म्यूज’अंतर्गत महाविद्यालयात त्याने मूव्ही क्लब स्थापन केला. आणखी काही महाविद्यालयांतही पोहोचला. मुलांना सामाजिक प्रश्नांची जाण यावी, हा मुख्य हेतू होता.
Nishant Bangera Muse Foundation make children aware of social issues
Nishant Bangera Muse Foundation make children aware of social issues sakal
Summary

‘म्यूज’अंतर्गत महाविद्यालयात त्याने मूव्ही क्लब स्थापन केला. आणखी काही महाविद्यालयांतही पोहोचला. मुलांना सामाजिक प्रश्नांची जाण यावी, हा मुख्य हेतू होता.

- जयवंत चव्हाण

निशांत बंगेरा हा मध्यमवर्गीय कुटुंबातील ठाण्यात राहणारा मुलगा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने नोकरी सुरू केली; पण महाविद्यालयात असल्यापासूनच त्याला सामाजिक प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्या काळात त्याने काही माहितीपट, लघुपट पाहिले. त्यातून त्याची सामाजिक प्रश्नांबाबतची जाणीव तीव्र झाली.

२०१२ मध्ये त्याने म्यूज फाऊंडेशनची स्थापन केली. युवकांना विचारप्रवृत्त करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश. जे प्रश्न त्याला पडतात, ते विद्यार्थ्यांनाही पडत असतील किंवा पडावेत, या जाणिवेने ‘म्यूज’अंतर्गत महाविद्यालयात त्याने मूव्ही क्लब स्थापन केला. आणखी काही महाविद्यालयांतही पोहोचला. मुलांना सामाजिक प्रश्नांची जाण यावी, हा मुख्य हेतू होता.

जाहिरात एजन्सीमध्ये नोकरी करताना त्याला पहिल्यांदा मुलींच्या मासिक पाळीचा प्रश्न समजला. तिथले काही लोक पालघरमधील गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करायचे. प्रत्येकाकडून देणगी गोळा करून तिकडे जाऊन वाटायचे.

Nishant Bangera Muse Foundation make children aware of social issues
Social media Effects : हजारो पुस्तकांचा खजिना; पण वाचक काही फिरकेना!

सुरुवातीला हे काम सोपे वाटले. खोलात गेल्यावर विषयाचे गांभीर्य समजले. मुली तर वाढत होत्या, त्यामुळे किती काळ पॅकेट वाटणार, हा प्रश्न होता. त्यानंतर या विषयाबाबत आणखी माहिती घेतली. मग विविध भागांत शिबिरे घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई, ठाण्यातील वस्त्यांमध्ये गेला.

अनेकदा असे उपक्रम फक्त साधनांपर्यंत सीमित राहतात. त्याचवेळी अनेक समस्या विविध वस्त्यांमध्ये निशांतला दिसल्या. काही बुरसटलेल्या संकल्पना अस्तित्वात आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आढळल्या. यावर त्याला जागृतीसाठी मासिका महोत्सवाची कल्पना सुचली. त्याने २०१७मध्ये या उपक्रमाला सुरुवात केली.

Nishant Bangera Muse Foundation make children aware of social issues
Guyana School Fire : मोबाईल जप्त केल्याचा राग, १४ वर्षांच्या मुलीनं शाळेलाच लावली आग! २० जणांचा नाहक बळी

मासिक पाळीचा उत्सव करता येईल का, येतो का, असे अनेक प्रश्न होते. या विषयातील अनेक समस्या या त्या महिलेच्या नाहीत, तर समाजाच्याही आहेत, हेही वास्तव यानिमित्ताने निशांतला आढळले. मग या उत्सवात महिलेच्या घरातील सर्वांना, विशेषतः पुरुषांनाही सहभागी करून घेण्यास सुरुवात केली.

उत्सव आहे असे सांगितले की लोक येतात. खेळ, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमांमधून मासिक पाळीबाबत जागृतीस सुरुवात केली. त्यातून या विषयावर संवाद सुरू व्हावा, ही अपेक्षा आहे. निशांतसोबत सध्या १५ गटसदस्य आणि १०० स्वयंसेवक आहेत. त्याच्या काही मित्रांनी हा उपक्रम गुजरात आणि उत्तराखंडमध्ये सुरू केला.

Nishant Bangera Muse Foundation make children aware of social issues
Modi Video : संतांकडून पंतप्रधान मोदींनी स्वीकारलं 'सेंगोल', तमिळ परंपरेनुसार होणार स्थापना

सध्या ११ राज्यांमध्ये आणि १९ देशांमध्ये मासिका महोत्सव राबवला जातो. परदेशात विविध संलग्न संस्थांबरोबर ‘द पीरियड फेस्टिव्हल’ नावाने हा कार्यक्रम होतो. तिथेही चांगला प्रतिसाद मिळतो. झांबियामध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात तेथील राष्ट्राध्यक्षांबरोबर राजकीय नेतेही सहभागी झाले होते. त्यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.

या समस्येवर शासकीय पातळीवर धोरणात्मक उपायांचीही गरज आहे. मुंबई, ठाण्यातल्या वस्त्यांमध्ये निशांतच्या संस्थेने केलेल्या पाहणीत ६० टक्के महिला सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात, असे आढळले आहे. शौचालय असेल तर पाणी आहे का, असा दुसरा प्रश्न. याखेरीज बेघर, अंध, अपंग महिलांचे प्रश्न आणखी गंभीर असतात.

यावर अधिक जागृतीची गरज असल्याचे मत निशांत मांडतो. हे काम शहरी भागातच सीमित आहे, ग्रामीण भागात पोहोचायचे आहे. दार्जिलिंगच्या चहा कामगारांसाठीही ते सुरू केले आहे. हा मासिका उत्सव देशभर व्हावा, सामाजिक जागृती व्हावी, हे ध्येय ठेवून निशांत कार्यरत आहे. याशिवाय पाणी वाचवणे, मोबाईल टाॅवरचे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर तरुणांमध्ये जागृती करतो. काही चांगले बदल व्हावेत, हीच अपेक्षा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com