

platinum jewellery
sakal
पल्लवी शर्मा
भारतात सणासुदीच्या हंगामात व लग्नसराईतही दागदागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि दागिन्यांची बाजारपेठ एक नवे वळण घेते. अलीकडे सर्वसामान्य लोकांनी अन्य पर्यायांचा शोध घेतल्याचे दिसते. नुकत्याच सरलेल्या दिवाळीच्या काळात सोने-चांदीचे भाव गगनाला भिडल्याने या बदलाला गती मिळाली. परवडणारी किंमत, आकर्षक डिझाइन आणि टिकाऊपणा असलेल्या ‘प्लॅटिनम’ने लोकांना आकर्षित केले आहे. विशेषतः तरुण पिढीचा कल प्लॅटिनमकडे वाढत आहे. त्यामुळे अलीकडच्या काही तिमाहींमध्ये प्लॅटिनम दागिन्यांची विक्री स्थिर राहिलेली दिसत आहे.