राज्यरंग - राजस्थान : ‘सार्थक नाम अभियान’ ठरले निरर्थक

राजस्थानातील सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची ‘अर्थहीन’ नावे बदलण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला एआयवर आधारित विचित्र नावांच्या यादीमुळे पालक व संघटनांचा तीव्र विरोध; अखेर ‘सार्थक नाम अभियान’ रद्द
राजस्थान सरकारचा 'सार्थक' फियास्को! एआय (AI) च्या मदतीने मुलांची नावे बदलण्याचा घाट अंगलट; 'दहीभाई' आणि 'मख्खी' सारख्या नावांच्या यादीमुळे नामुष्की

राजस्थान सरकारचा 'सार्थक' फियास्को! एआय (AI) च्या मदतीने मुलांची नावे बदलण्याचा घाट अंगलट; 'दहीभाई' आणि 'मख्खी' सारख्या नावांच्या यादीमुळे नामुष्की

Sakal

Updated on

किशोर जामकर

सरकारने नको तिथे नाक खुपसले की ते कसे कापले जाते, याचा उत्तम नमुना राजस्थानमध्ये दिसून आला. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्थहीन आणि कालबाह्य नावे बदलून त्यांना नवी ओळख देण्याच्या उदात्त उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘सार्थक नाम अभियान’ वादानंतर अखेर मागे घेण्यात आले आहे. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी जाहीर केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना कोणतेही कारण न देता रद्द करण्याची नामुष्की सरकारवर यामुळे ओढवली आहे. एखाद्या उपक्रमाचा सरकारी बाबूगिरीत कसा गळा आवळला जातो याची ही रंजक कथा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com