esakal | ढिंग टांग  :  खळ्ळ खट्याक ते सविनय कायदेभंग!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग  :  खळ्ळ खट्याक ते सविनय कायदेभंग!

लॉकडाउन आणि ‘वर्क फ्रॉम होम’ची सवय लागल्याने हल्ली दहाच्या आत डोळा उघडणे अशक्‍य होते. पण अन्यायकारी राजवटीचे तोंड फोडायचे, म्हंजे सकाळी लौकर उठणे भाग होते. क्रांतीसाठी काहीतरी किंमत मोजावीच लागते. 

ढिंग टांग  :  खळ्ळ खट्याक ते सविनय कायदेभंग!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

भल्या सकाळी लौकर उठून भुईकोट रेल्वे स्टेशनाला अल्लाद वेढा घालायचा, आणि वेषांतर करोन स्टेशनची चिरेबंदी भेदायची, असा खासा बेत ठरला. बेत खासा होता, पण सकाळी लौकर उठण्याचे कलम अंमळ अवघड  होते.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउन आणि ‘वर्क फ्रॉम होम’ची सवय लागल्याने हल्ली दहाच्या आत डोळा उघडणे अशक्‍य होते. पण अन्यायकारी राजवटीचे तोंड फोडायचे, म्हंजे सकाळी लौकर उठणे भाग होते. क्रांतीसाठी काहीतरी किंमत मोजावीच लागते. ठरविल्याप्रमाणे सकाळी (तीन-तीन गजर लावून) उठलो. यावेळी खळ्ळखट्याक नव्हे, तर सविनय कायदेभंग करायचा आहे,असे स्वत:स वारंवार बजावले. सर्वसाधारणत: अत्यावश्‍यक सेवेतील नोकरदाराचा वेष करावा, ऐसे ठरले होते. सकाळची तयारी करत होतो, तेव्हा कुटुंबाने सैपाकघराच्या उंबऱ्यावरून आठवण  करून दिली-‘‘ पेरुचा पापा राहिला हं!’’ भयंकर ओशाळून इकडे तिकडे पाहिले. मुले झोपली होती म्हणून बरे! पण आम्ही भलताच पेरु समजलो होतो! पूर्वी ड्यूटीवर जाताना ‘पेरुचा पापा’ घेत असत. (पेन, रुमाल, चावी, पाकिट, पास) पण हल्लीच्या काळात ‘मोरुचा मासा’ (मोबाइल, रुमाल, चावी, मास्क आणि सानिटायझर)  नेतात. शेवटी मोरुचा मासा घेऊन निघालो. वेषांतर बेमालूम झाले होते. हातात टिफिन, पायात सॅंडल, काखेत हॅंडबॅग, नाकावर मास्क, कॉलरीत रुमाल, खिशात सॅनिटायझरची बाटली.  सदर इसम ज्वलज्जहाल मनसैनिक आहे, असे कोणीही म्हटले नसते. कोपऱ्यावरील रिक्षावाल्याला हात केला. तो थांबला नाही. मुजोर लेकाचा! शेवटी चालत स्टेशनवर आलो.

तिथे प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. बंदोबस्तावरचे पोलिस कावलेले होते. सकाळी उठून ड्यूटीवर यावे लागलेला कोणीही कावणारच. छोट्या-छोट्या कागदी गिलासातून कटिंग पीत ते कर्तव्य बजावत होते. त्यांची नजर चुकवून आम्ही सरळ स्टेशनात घुसलो. कोणीही आडवले नाही! कित्ती दिवसांनी आम्ही आतमधून स्टेशन पाहिले. मन भरुन आले!!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘साहेब, डब्यात अपोझिट साइडने चढू या!’’ शेजारच्या मास्कवाल्याने कानात सांगितले. मी चमकून पाहिले. त्याने (मास्कआडून) ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणून उभा पंजा ओठांशी नेऊन इंजिनाच्या शिट्टीसारखा  ‘कूऽऽक’ असा आवाज काढून आपणही मनसैनिक असल्याचा पुरावा दिला. आम्ही त्याला ‘थम्सअप’ केले. तेवढ्यात एक लोकलगाडी आली. 

चालत्या गाडीत चढून विंडो पकडायची हे आमचे ध्येय होते. तशी आम्ही पकडली, आणि गेल्या एकोणीस वर्षांच्या चाकरीत पहिल्यांदा विंडोसीट मिळाली!! अंगावर वारे घेत, माटुंगा, सायन, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप या निसर्गरम्य स्थळांची शोभा डोळे भरुन पाहात पाहात ठाण्यापर्यंत जायचा बेत होता. पण सविनय कायदेभंग हे आपले उद्दिष्ट आहे, निसर्गवाचन नव्हे, याचे स्मरण झाले. अखेर कुर्ल्याला उतरलो. उतरल्या उतरल्या आम्हाला हटकण्यात आले. आता अटक होणे अटळ होते. क्रांतिकारकाला नेहमीच कारावासाची तयारी ठेवावी लागते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘कशाला कटकट वाढवता साहेब! तुमच्यासारखी जंटलमन माणसं असं करायला लागली तर कसं व्हायचं?’’ हटकणाऱ्या अधिकाऱ्याने समजावणीच्या सुरात सांगितले.

‘‘आमचा सविनय कायदेभंग आहे!’’ आम्ही बाणा सोडला नाही.

‘‘फाइन भरा, आणि जा ना साहेब! विदाऊट तिकिट प्रवासाचं येवढं काय मनावर घेता?’’ तो अधिकारी तिकिट तपासनीस निघाल्याने आमचा नाही म्हटले तरी विरस झाला. शेवटी ‘पुन्हा असे करु नका’ असे सांगून त्यानेही (फुकट) सोडून दिले!!

पुढल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीसाठी अधिक तयारी करायला हवी!