esakal | ढिंग टांग : भाई का गेम! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : भाई का गेम! 

हमारे वन अँड ओनली डॉनच्या जिवालय हे सोशल मीडियावाले का उठले, काही टोटल लागत नाही. आजपरेंत आपण एकाही सोशल मीडियावाल्याला फोन मारुन खंडणी मागितलेली नाही की टपका डालनेकी धमकी दिलेली नाही.

ढिंग टांग : भाई का गेम! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

डिअरम डिअर होम्मिनिष्टर साहब, सलीम कंघीचा सलाम. भोत सालों बाद (सच्चीमें बोलूं तो फस टाइमईच!!) आपुन कू डायरेक खत लिख रहेला है! बुरा मत मानना. आपल्या गँगमधला मुन्ना सायकल पढालिखा माणूस आहे. (सायकल चालवत लेडीज लोकांच्या गळ्यातली चैन, पर्स इज्जतीत उचलणारा मुन्ना नववी नापास आहे, और) ये खत उसीसे लिखके लिया है. आपन काही लिखापढीवाली मानसे नाही. आपल्या हातात घोडा असतो, पेनपेणसिल नाही. मतलब आक्शराला हासू नये, ही रिक्वेष्ट आहे. थँक्यू. आपन डायरेक फोनच करणार होतो, पन तुमचे लोग आपला फोन टॅप मारतात, आणि खालीपिली लोकेशन समजते. मागल्या टायमाला छोटा साजन मलेशियावरुन वार्ता करत होता, फोन ठेवायच्या आत पोलिस दारात हाज्जिर! पन आता इमर्जंन्सी आली, इसलिए खत लिख रहेला है. खत लिखने की वजहा की, गेले दोन-तीन दिवस ब्रेकिंग न्यूज बगून होश उडाला होता. कराची का आपुनका भाई दाऊदभाई (उप्परवाला इनकू लंबी उमर दे!) गुजर गया करके! कसमसे सांगतो, आपला तर इस्वास बसला नाही. तुमचे मीडियावाले कुछ भी न्यूज उंडेल देते है. ऐसा चलेगा नही. ये सोशल मीडियावालों को तो सीधा टायर में लेने की भोत जरुरत है. जरा जादाच करायला लागलेत! हमारा दाऊदभाई कोविडने कसा जाईल? ये सरास गलत फहमी आहे. दाऊदभाईसारखा डॉन कोरोनाने गेला, असे बोलणे म्हंजे मुन्शिपाल्टीचे जहर खाऊन खानदानी आल्सेशन मेला, असे बोलण्यासारखे आहे. मुन्शिपाल्टीवाल्यांचे जहर आजकाल सडकछाप कुत्रे पण हाजम करतील, हा भाग अलाहिदा! ते जाऊ दे. हमारे वन अँड ओनली डॉनच्या जिवालय हे सोशल मीडियावाले का उठले, काही टोटल लागत नाही. आजपरेंत आपण एकाही सोशल मीडियावाल्याला फोन मारुन खंडणी मागितलेली नाही की टपका डालनेकी धमकी दिलेली नाही. नुसता टाइमपास करणाऱ्या या सोशल मीडियावाल्यांकडे दमडा नाही, हे गल्लीतला विटीदांडू खेळणारा पोरगासुध्दा सांगेल. पन आपन त्यांचे घोडे मारलेले नसताना किंवा त्यांना घोडा (खुलासा : घोडा याने की पिस्तुल) दाखवला नसताना डॉनची अशी बदनामी करणे, हा गुनाह आहे, हे त्यांना सांगितले पाहिजे. डॉनकू कोविडसे बिदा करने का इंडियन मीडिया का ये डाव झूठा है, हे सांगण्यासाठीच आपल्याला हे आर्जंट खत आर्जंटमधे लिहीत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अंदर की बात सांगतो. भाई कराचीच्या आपल्या आड्रेसवर गिलासात बरफ टाकून शिकंजी पीत आरामात बसला आहे. त्याला काहीही धाड भरलेली नाही. आजवर मीडियावाल्यांनी त्याचा आठधा वेळा तरी असा गेम केला आसंल!! पन दर टायमाला अपना भाई बच जाता है. खैरियत रहे!! जिसकू ढूंढने कू ग्यारा मुल्कोंकी पुलिस आस्मान आऊर झन्नम ( खुलासा : आकाश आणि पाताळ याचा अनुवाद! ) एक करत आहेत, तो डॉन साधा खांसी-जुकामसे मरणार? ये मुश्किलही नही, बल्की नामुमकीन है, साहब!! तेव्हा तुमच्या सोशल मीडियावाल्यांना सांभाळा! नहीं तो बुरा अंजाम होगा (खुलासा : हे उगीच! ज्यांना पोलिटिशन लोग काही करु शकत नाहीत, त्या सोशल मीडियावाल्यांना आपुन काय करणार?) बाकी ठीक. फिर मिलेंगे!! आपका अपना सलीम कंघी (डॉन का लेफ्ट हँड!)