esakal | ढिंग टांग : गलत पते की बात!
sakal

बोलून बातमी शोधा

dawood-ibrahim

आहे!! दाऊद नावाच्या आदमीचे कुठलेही आधारकार्ड आमच्याकडे मौजूद नाही. (तुमच्या इंडियात नक्की असेल!) तसेच ‘ व्हाइट हाऊस, सौदी मसजिद के नजदिक, क्‍लिप्टन, कराची‘ हा त्याचा पतादेखील सौफिसदी गलत आहे.

ढिंग टांग : गलत पते की बात!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

रुस्तमे हिंद वजीरे आजम जनाम नमोजीसाहब, नाचीज इमरान का आदाब. बहोत दिवसांनंतर आपल्याला खत-ए-खुशहाली भेजण्याची संधी मिळत आहे. बताना लाजमी होगा के, आमच्या मुल्कात कोरोनाची विशेष तकलीफ नाही. याने की अवाम तकलीफमध्ये असेलही, लेकिन मी ज्यादा मनावर घेत नाही! हा कोरोनाच्या विरोधात जिहाद आहे, असे सांगितले की बास होते!! ...

हमने देखें है कई जानलेवा वायरस
कोरोना क्‍या चीज है, न होंगे टस से मस
जिन्हे नाज है दहशतपर, जो खाते है बुलेट
वो क्‍या करेंगे बर्खुर्दार इंतजार-ए-लस!


.... अशी शेरोशायरी मी नुकतीच केली. सध्या ती खूप फेमस होत आहे. कशी आहे? इंतजार- ए- लस चा अर्थ कळला ना? जाने दो. खत लिखने का मसला कुछ अलगही है. हालात कुछ ऐसे बन गए की काल आमच्या हुक्‍मरानला (याने की आम्ही!) एक यादी-ए- जंटलमन प्रसिध्द करावी लागली. हे जंटलमन लोग आमच्या पाकिस्तानच्या सरजमींवर मुकाम करतात, हे आमचं खुशनसीब (याने की भाग्य)! दुनिया त्यांना दहशतगर्द म्हणून खामखां बदनाम करते. दहशतगर्दांची यादी  कधी प्रसिध्द करताय? असा लकडा यूनोने लावल्यामुळे आम्ही ही यादी जाहीर केली, यूनो? त्या यादीमध्ये जनाब दाऊदभाई बिन इब्राहीम कासकर या कलंदर इन्सानचे नाम शामील आहे, आणि त्यांची पैदाइश तुमच्या हिंदुस्थानी मुल्कातच झाली आहे. क्‍या सूरमा पैदा किया है? वाह वाह! जनाब दाऊदभाई हे कलंदर किस्मचे भले इन्सां आहेत. काही काळ त्यांनी आमच्या कराचीमध्ये मुकाम केला, आणि आमची सरजमीं पवित्र केली, हे सच आहे. लेकिन यह शख्स कब और कहां होता है, ये किसी को पता नहीं चलता. जनाब दाऊदभाईंना गरीबांचा कळवळा आहे. जरासे दु:ख दिसले तरी 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दाऊदभाई तिथे पोचलेच! किंबहुना (यह लब्ज बंबईके बांदरा के एक शायरने कई बार इस्तेमाल किया था! रहने दो, याने की असो!!) अनेकदा जनाब  दाऊदभाई पहले पोहोचतात, मग तेथे दु:ख उपटते!

लेकिन अफसोस, अशा नायाब आणि सूरमा शख्सियतला तुमचा मीडिया सरासर बदनाम करतो आहे. जनाब, ये क्‍या माजरा है? दाऊद इब्राहीम नावाचा  कुणी एक शख्स आमच्या पाक भूमीत दडून बसला आहे, असा मसला इंडियन मिडीयाने दाखवला. सदर शख्स हा दहशतगर्ज आदमी असून दुश्‍मन-ए-हिंदोस्तां आहे, असे तुमचा मीडिया सांगतो. हा आदमी कराचीत आलिशान महलमध्ये राहातो, म्हणे! लाहौल बिलाकुवत! यह सरासर गलत फहमी

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आहे!! दाऊद नावाच्या आदमीचे कुठलेही आधारकार्ड आमच्याकडे मौजूद नाही. (तुमच्या इंडियात नक्की असेल!) तसेच ‘ व्हाइट हाऊस, सौदी मसजिद के नजदिक, क्‍लिप्टन, कराची‘ हा त्याचा पतादेखील सौफिसदी गलत आहे. या पत्त्यावर मी आमचा खुफिया एजंट पाठवून थोडी तफतीश केली. आमच्या एजंटाने (पीपीइ किट पेहनून) त्या घराचा दरवाजा ठोठावला. आतून आवाज आला : ‘कौन है बे?‘ एजंटाने नाव सांगितले. त्यावर ‘साहब घर पे

नहीं है‘ असा बंद दाराआडून जबाब मिळाला. दाऊदभाई इथे राहात नाही, याचा याहून अधिक कोणता पुरावा हवा? बोलो. बाकी सब ठीक. फिर मिलेंगे. आप का अपना, 
इमरान खान (माजी क्रिकेटपटू&फास्ट बोलर!)