esakal | ढिंग टांग : सत्तर माने अत्तर!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : सत्तर माने अत्तर!

आज तर नमोजीभाईंचा हॅप्पी बर्थडे असल्याने समस्त मोर खुशीत डान्स पार्टी करीत आहेत. दाणेबिणे खात आहेत. नमोजीभाईंच्या हातातले दाणे संपले की शेजारी बसलेले मा. मोटाभाई दाण्यांचा पुरवठा करीत आहेत...

ढिंग टांग : सत्तर माने अत्तर!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : , लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही. वेळ : सकाळची.

प्रधानसेवक मा. श्री. नमोजीभाई घराच्या हिरवळीवर मोरांना दाणे टाकत आहेत. मा. नमोजीभाईंच्या बागेत खूप मोर आहेत. आपल्या अंगणात फार्तर कोंबड्या असतात. त्यांच्या बागेत मोर!! आज तर नमोजीभाईंचा हॅप्पी बर्थडे असल्याने समस्त मोर खुशीत डान्स पार्टी करीत आहेत. दाणेबिणे खात आहेत. नमोजीभाईंच्या हातातले दाणे संपले की शेजारी बसलेले मा. मोटाभाई दाण्यांचा पुरवठा करीत आहेत...दोन तीन मोर उगीचच पिसारा फुलवून नाचून दाखवतात. ‘‘वाह भाई वाह! मजा आवी गया!’’ अशी दाद देत नमोजीभाई खुश होऊन त्यांना आणखी थोडे दाणे (बिदागी म्हणून) देतात...अब आगे.

देशभरातील  बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नमोजीभाई : (नेहमीच्या उदंड उत्साहात गाणं गुणगुणत) नाचे मन मोरा, मगन धिक धा धिगी धिगी...ऑ ऑ ऑ ऑ...ए भाय, थोडु नाच ने...आगळ पाछळ...हां एवी रिते... (इथे काही मोर नाचून नाचून थकून माना टाकतात.)

मोटाभाई : (तंद्रीत) मने शुं कह्यू?

नमोजीभाई : (दाणे टाकत) तमे नथी, आ मोरने कहूं छूं...ए, नाच ने, मोरभाई!! (मोटाभाईंकडे वळत) तमे केम छो? बध्दा सारु छे ने?

मोटाभाई : (नम्रपणाने)...आपडी क्रिपा छे, नमोजीभाई! एवरीथिंग इज फाइन नमोजीभाई!! जे श्री क्रष्ण!

नमोजीभाई : (ममतेने विचारपूस करत) क्‍यारे आव्यो?

मोटाभाई : (अतिनम्रतेने) अमणाज...विश यु हेप्पी बर्थडे नमोजीभाई! जुग जुग जिओ! (घोगऱ्या आवाजात गुणगुणत) तमे जिओ हजारो साल, सालनी दिवस हो पच्च्यास हजार!! 

जगभरातील  बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नमोजीभाई : (आध्यात्मिक हसत) थेंक्‍यू, मोटाभाई! तमे ढोकळा आपूं? सित्तर किलोना लड्डू पण बनाव्या छे! आपूं? हुं सत्तर ना थई गया मोटाभाई!!

मोटाभाई : (भक्तिभावाने) सत्तर माने अत्तर!!  एमनेएमज तुमच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कमळ पक्षातर्फे सेवा सप्ताह जाहीर केला आहे ना!

नमोजीभाई : (अचंब्याने) सेवा सप्ताह माने शुं करवानुं?

मोटाभाई : (खुलासा करत) देशभर मां जनसामान्यांना मास्क, सेनिटायझर वाटणार! घरेघर जाऊन विचारपूस करणार के- ‘‘ भाई, सब ठीक तो छे ने? बेन, बुखार तो नथी ने? बाबा, बारंबार हाथ तो धोए छे ने? तमे बध्दा स्वस्थ रहो, अने स्वच्छ रहो!’’ (सेवाभावी वृत्तीने) आ बध्दा देश आपडा परिवार छे, अने तमे कुटुंबप्रमुख! हूं तो एक पन्नाप्रमुख कार्यकर्ता छूं!!

नमोजीभाई : (गंभीर होत) माझ्या वाढदिवसानिमित्त मला देशाला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायची होती! कोरोनाची लस आली असती तर तीच दिली असती! पण आ साएंटिस्ट लोगने बहु लेट किधु!! सब पती गयो!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोटाभाई : (अतीव आदराने) कोरोना हवे रेहवा दो!! देशविदेशथी मेसेजनी बाढ आवी गई छे! आपडा रशियाना पुतिनभाई, जर्मनीनी आपडी अंजलाबेन मर्केल, अमरिकाना डोनाल्डभाई...बध्दा लोगोने आपडे बर्थ डे विशेस मोकळ्या छे!! 

नमोजीभाई : (डोकं खाजवत) हुंऽऽ...पण रिटर्न गिफ्ट शुं मोक़ळवानुं?

मोटाभाई : (मोफतचा सल्ला देत) फक्त एक रिटर्न ट्‌विट करी नाखो! -‘‘थेंक्‍यू व्हेरी मच!!’’ टाइम बहु खराब च्याले छे! कोरोना, चायना, बेरोजगारी, अर्थव्यवस्थाना बेंडबाजा...एटला प्रोब्लेममा रिटर्न गिफ्ट मोकळवाना ठीक नथी!! 

नमोजीभाई : (कौतुकाने थाप मारत) एकदम  खरी वात!! ए चालसे...(पुन्हा मोरांकडे वळत) ऑ ऑ ऑ ऑ...