esakal | ढिंग टांग : सूपडा साफ!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

नमोजी : (हळूचकन फोन फिरवत) हलोऽऽ जे श्री क्रष्ण! मारा फ्रेंड शीभाई छे के?
शी जिनपिंग : (शुद्ध गुजरातीमध्ये) वात करुं छूं! कोण छे?
नमोजीभाई : (स्नेहार्द्रपणे) अरे, हूं नमो! तमारा पडोशी!! केम छो? बद्धा सारु छे ने?
शीभाई : (घाईघाईने)  सारु-बिरु काही नाही! कसलं आलंय सारु? इथे आमच्या धंद्याची वाट लावायला घेतली तुम्ही! सूपडा साफ!! पडोसी म्हणे!!

ढिंग टांग : सूपडा साफ!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

नमोजी : (हळूचकन फोन फिरवत) हलोऽऽ जे श्री क्रष्ण! मारा फ्रेंड शीभाई छे के?
शी जिनपिंग : (शुद्ध गुजरातीमध्ये) वात करुं छूं! कोण छे?
नमोजीभाई : (स्नेहार्द्रपणे) अरे, हूं नमो! तमारा पडोशी!! केम छो? बद्धा सारु छे ने?
शीभाई : (घाईघाईने)  सारु-बिरु काही नाही! कसलं आलंय सारु? इथे आमच्या धंद्याची वाट लावायला घेतली तुम्ही! सूपडा साफ!! पडोसी म्हणे!!
नमोजीभाई : (च्याटंच्याट पडत) लो करलो वात!! मिसअंडरस्टेंडिंग झ्याला हाय तुमच्या! तमे तो पडोसी छो! आवो, आवो, बेसीने वात करीश! कभी तो पधारो हमारे इंडिया मां!!
शीभाई : (संतापून) नको! मित्र म्हणून घरी बोलावता, झोपाळ्यावर बसून नारळपाणी पाजता आणि दुसरीकडे तुमचं ते हे...आतम निलबल... आत.. आत्म...निरभल...आत्म.. निर्भल-
नमोजीभाई : (शांतपणे) आत्मनिर्भर म्हणायच्या हाय के तुम्हाला?
शीभाई : (वैतागून) तेच ते! काय पण शब्द काढलाय!! हु:!!
नमोजीभाई : (समजावून सांगत) एकदम चोक्कस आयडिया छे, शीभाई! आत्मनिर्भर याने बद्धा चीजवस्तु आपडे हाथथी बनवानु अने वापरवानुं!! सांभळ्यो?
शीभाई : (घुश्‍शात) ते आम्ही गेली कित्येक वर्षं करतोय! आमच्या शेजारी तुम्ही नवीन दुकान उघडल्यावर आमचं गिऱ्हाईक तुटणार नाही का? हा काय शेजारधर्म झाला?
नमोजीभाई : (झोपाळ्यावर बसल्यागत) तुम्ही खूप मेहनत केली, शीभाई! हवे तमे रिटायर थई जावो! हूं छूं ने!! जस्ट डॉण्ट वरी! 
शीभाई : (संतापाने डोळे आणखीनच बारीक करत) अस्सं? मग आमच्या चिनी मार्केटचं काय? जगाचं आणि तुमचंही मार्केट आमचंच आहे, हे लक्षात ठेवा! एका गल्लीत एकच दुकान राहील! जादा आवाजी नाय पायजे!!
नमोजीभाई : (शांतपणे) मी पण तेच म्हणतो! तमारा दुकान हवे बंद करो! हूं च्यालू करीश!!
शीभाई : (भडका उडून) आणि आम्ही काय झ...झ..झोपाळ्यावर बसून नारळपाणी प्यायचं? हे शक्‍य नाही!!  ये सब दुनिया एक चिनी ड्रॅगन का मार्केट है, और इस मार्केट में सब ड्रॅगन के गिऱ्हाइक है...
नमोजीभाई : (डोळे बारीक करून) मार्केट ड्रेगनच्या! गिऱ्हाइक पण ड्रेगनच्याच! सियाचीन, तिबेट, अने लद्दाख मां पेनगाँग लेक पण ड्रेगनच्याचच के?
शीभाई : (जमतील तितके डोळे गरागरा फिरवत) अर्थात! सब कुछ ड्रॅगन का है! 
नमोजीभाई : कोरोना वायरस पण ड्रेगनच्याच ने?
शीभाई : (अनवधानाने) अफकोर्स! (गडबडून) नाही नाही, कोरोना सगळ्या जगाचा आहे!!
नमोजीभाई : (निर्वाणीच्या सुरात) जुओ, शीभाई! हवे अमणां तो आत्मनिर्भर होवानी जरुरतज छे! जाग्या त्याथी सवार!! बराबर ने? तुम्ही लडाखमधून वापिस जावा, मी आत्मनिर्भरच्या काहीतरी अडजेस्ट करते!! नाय तर तुमच्या ड्रेगनच्या काय खरा नाय!! सूपडा साफ होऊन ज्यानार!!
शीभाई : (दर्पोक्तीने) नाय नो नेव्हर! चिनी ड्रॅगन कधी सौदेबाजी करत नाही! (तुच्छतेने) आणि गिऱ्हाइकाने दुकानाचा मालक होण्याची स्वप्नं पाहू नयेत!
नमोजीभाई : (शेवटला घाव) ठीक छे! गिऱ्हाइक दुकानाच्या मालक नाय झ्याला तरी लोकडाऊन तर करू शकते ने? कछु सांभळ्यो? कस्टमर इज द किंग शीभाई!! जेणो काम तेणो थाय, बीजा करे तो गोतो खाय!! जे श्री क्रष्ण!!