ढिंग टांग : बच्चा खेलेगा..!

ब्रिटिश नंदी
Thursday, 3 September 2020

‘गामड्यामधला डोग एकदम चलाख अने चुस्त असते. पाळवानुं होय, तो गामडा डोग पाळजो! सांभळ्यो?’’ गुरुवर्य नमोजींनी सुरक्षेचा मंत्र दिला, आणि आमचे कान आणि डोळे खाडकन उघडले. सदगदित होत्साते आम्ही कुंई असे करणार होतो. शेपूट असते तर तेदेखील थोडेसे हलवले असते! ज्याला आपण गामडानुं डोग एवं गावठी कुत्तरडे असे संबोधतो, त्याची अशी स्तुती ऐकून आम्हाला भरते येणे स्वाभाविक होते.

‘गामड्यामधला डोग एकदम चलाख अने चुस्त असते. पाळवानुं होय, तो गामडा डोग पाळजो! सांभळ्यो?’’ गुरुवर्य नमोजींनी सुरक्षेचा मंत्र दिला, आणि आमचे कान आणि डोळे खाडकन उघडले. सदगदित होत्साते आम्ही कुंई असे करणार होतो. शेपूट असते तर तेदेखील थोडेसे हलवले असते! ज्याला आपण गामडानुं डोग एवं गावठी कुत्तरडे असे संबोधतो, त्याची अशी स्तुती ऐकून आम्हाला भरते येणे स्वाभाविक होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘इंडियन गामडाना डोग बहु सरस ब्रीड छे! खबर छे?’’ नमोजींनी अभिमानाने सांगितले.. अशा जबरदस्त ब्रीडला हडी हडी करण्यात आमची हयात गेली, याची जाणीव होऊन आम्ही हळहळलो! आजवर कित्येक जबरदस्त श्वानांना बघून आम्ही वाटेतले दगड उचलले, या कल्पनेने अपराधी भाव मनात दाटला. अशा जबर्दस्त प्रजातीला मुन्शिपाल्टीवाले जाळी टाकून पकडून गाडीत टाकतात, हे किती भयानक आहे नै? आजवर आम्ही पामेरियनवादी होतो! श्वान पाळलेच, तर ते दिसायला विलायती दिसले पाहिजे, अशी काही तरी विचित्र कल्पना आम्ही बाळगून होतो. ‘‘गावठी कुत्री पाळू म्हंटा?’’ आम्ही खुंटा हलवून बळकट केला.

‘चोक्कस!’ गुरुवर्य नमोजींनी रुकार दिला. आमच्या गुरुवर्यांकडे कायम एक हजार एकशेअकरा औटॉफबॉक़्स आयडिया असतात. गावठी कुत्रे पाळण्याची ही आयडिया क्रमांक एक हजार एक़कशेबारावी!

मुळात श्वान या प्रजातीचे आमचे फारसे मैत्र जमले नाही. आमच्या चेहऱ्याची ठेवणच (बहुधा) अशी आहे की रस्त्यावरील देशी श्वानांना इसाळ येतो! आमची डुलत डुलत चालणारी आकृती लांबवरुन बघून आमच्याकडे हमखास झेपावतात. या श्वानांचे आम्ही काय घोडे मारले आहे, कुणास ठाऊक! पण इथे खुद्द गुरुवर्य नमोजी आम्हाला गावठी कुत्री पाळा, असा आदेश देत होते. ऐकणे भाग होते. ‘’कुत्रानी वात रेहवा दो! खिलौना बनावो, खिलौना!’’
 सावंतवाडीचे एक लाकडी खेळणे आमच्यासमोर गुलाबासारखे धरुन गुरुवर्य नमोजींनी नवा आदेश जारी केला.

‘खेळणी?’’ आम्ही हबकून विचारले.
‘करेक्‍ट!’’ नमोजी डोळे मिटून म्हणाले. आम्ही हवालदिल झालो. (कारण ही आयडिया क्रमांक एक हजार एकशे तेरा होती!) या देवमाणसाचे आता काय काय ऐकायचे? योगासने करा, असे सांगितले, तेव्हापासून रोज पद्मासनाशी झगडतो आहो! टाळ्या वाजवा म्हणाले, वाजवल्या, मेणबत्त्या पेटवा म्हणाले, पेटवल्या! स्वच्छता पाळा, म्हणाले, तेव्हापासून...जाऊ दे! उगाच नसता तपशील कशाला?

‘खिलोनाच्या मार्केट एकदम होट हाय...खबर छे?’’,नमोजींनी आतली खबर दिल्याच्या खाजगी आवाजात टिप दिली.‘‘होट? हां, हां, हॉट!..’’ आम्हीही जरा भॉटच...आय मीन भोट आहोत! खेळण्यांच्या मार्केटचे अर्थशास्त्र त्यांनी आम्हाला समजावून सांगितले. ‘‘...इंडियन खिलोना बनावो, आत्मनिर्भर बनो!’’हातातली मेड इन सावंतवाडी बैलगाडी हवेत दौडवत गुरुवर्य नमोजी म्हणाले.
‘खरंच का गावठी कुत्री पाळून आणि खेळणी बनवून आपला देश आत्मनिर्भर बनेल?’’ आम्ही निरागस भक्तिभावाने विचारले.

‘सतप्रतिसत बनेगा!’’ एवढे म्हणून गुरुवर्य नमोजींनी त्यांच्या हातातली सावंतवाडीची लाकडी बैलगाडी आमच्या हातात प्रसाद म्हणून ठेवली. पुढे म्हणाले, ‘‘ बच्चा खेलेगा, बच्चे का बाप भी खेलेगा! कछु सांभळ्यो?’’
गुरुवर्यांनी आमच्या डोक्‍यावर टप्पल मारुन शक्कल सुचवली, आणि आम्ही तेथून निघालो....रस्त्यात दोन-चार ‘गामडानु डोग’ उभे होतेच. आम्ही यू यू असे त्यांस प्रेमाने आवाहन केले, आणि आत्मनिर्भर भारताचे ते चतुष्पाद मित्र आमच्या अंगावर धावून आले...!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on Dhing Tang