esakal | ढिंग टांग : गेट वेल सून!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : गेट वेल सून!

प्रिय मित्र मा. दादासाहेब, 
यांसी शतप्रतिशत प्रणाम. 
फारा दिवसांनी पत्र लिहीत आहे. खरे तर पहिल्यांदाच लिहीत आहे, पण ‘फारा दिवसांनी’ असे म्हटले की जरा बरे वाटते! माझ्या पाठोपाठ, तुम्ही पण इस्पितळात दाखल झाल्याची बातमी वाचनात आली. ती मी उशीराच वाचली. कारण मी सरकारी इस्पितळात आहे. इथे ताजी वर्तमानपत्रे येत नाहीत.

ढिंग टांग : गेट वेल सून!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय मित्र मा. दादासाहेब, 
यांसी शतप्रतिशत प्रणाम. 
फार दिवसांनी पत्र लिहीत आहे. खरे तर पहिल्यांदाच लिहीत आहे, पण ‘फारा दिवसांनी’ असे म्हटले की जरा बरे वाटते! माझ्या पाठोपाठ, तुम्ही पण इस्पितळात दाखल झाल्याची बातमी वाचनात आली. ती मी उशीराच वाचली. कारण मी सरकारी इस्पितळात आहे. इथे ताजी वर्तमानपत्रे येत नाहीत. आमच्या वॉर्डात एक टीव्ही लावला आहे, पण त्याच्या केबलवाल्याचे बिल न भरल्यामुळे तो बंदच आहे. बातम्या कळणार कशा? पण दैवगती पहा, वॉर्डात काम करणाऱ्या एका कोविडयोद्ध्याने भेळ आणली होती, त्या भेळीच्या कागदात तुम्ही दाखल झाल्याचे वाचले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(खुलासा : सदरील कोविडयोद्ध्याने पीपीइ किट घातले होते, त्यामुळे माणूस ओळखता आला नाही. त्याला नाव विचारले तर म्हणाला : ‘माझे नाव कोविडयोद्धाच!’ मी नाद सोडला.) माझ्या फोनची ब्याटरी डाऊन आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. चालायचेच. परंतु, आपली तब्बेत बरी आहे हे ऐकून अतिशय आनंद झाला. आपण दोघेही एकाच वेळी इस्पितळात दाखल झाल्यामुळे जनतेमध्ये (पुन्हा ) कुजबूज आहे. (असे ऐकतो!) हे आता काय नवीन? असा चेहरा काही लोकांनी केला असेल. कारण गेल्या खेपेला पुण्यात एका लग्न समारंभात आपण एकत्र अक्षता टाकायला होतो, तेव्हा
केवढा गहजब झाला होता!! आपण पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ लोक अजून विसरलेले नाहीत. ती शपथ विसरण्यासाठी मला व्यक्तिश: खूप प्रयत्न करावे लागले. किती तरी दिवस मी स्वत:ला मुख्यमंत्रीच समजत होतो. (आणि तुम्हाला आमचे उपमुख्यमंत्रीच!) आपण दोघेही एकदम इस्पितळात दाखल झाल्याने त्या पहाटेच्या आठवणी ताज्या झाल्या.

‘पुन्हा येईन’ असे मी म्हटले होते, पण माझा शब्द खरा करुन दाखवलात तुम्ही!! तुम्हीच परत आलात!! काही हरकत नाही.  कितीही पोलिटिकल आणि सोशल डिस्टन्सिंग असले तरी मनाचे अंतर नाही!! हो की नाही? तेव्हा काळजी घ्या. संधी मिळेल तेव्हा ओळख आहेच, ती दाखवा, ही विनंती! लौकरात लौकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हा!! कळावे. (त्या पहाटेनंतर) सदैव आपलाच.
नानासाहेब फ.
नानासाहेब, जय महाराष्ट्र! 
मी हिते इस्पितळात दाखल झालो आहे, हे तुम्हाला समजू नये म्हणून मी स्वत:च तुमच्या इस्पितळात येणारी वर्तमानपत्रे बंद केली होती. 
टीव्ही पण बंद ठेवायचे आदेश दिले होते. पण तरीही तुमच्या कुण्या कोविडयोद्ध्याने भेळीच्या निमित्ताने बातमी पोचवलीच! यालाच राजकारण म्हणतात. (पीपीइ किट घातलेला ‘तो’ कोविडयोद्धा कोण? याची माहिती काढायला गृहखात्याला सांगितले आहे! सापडेल!!)

माझी तब्बेत अतिशय उत्तम आहे. काही काळ विश्रांती घेऊन लगीच मंत्रालयात जाणार आहे. काळजी नसावी! तुम्हीही लौकर बरे व्हा. तशा शुभेच्छा तुमच्या जुन्या मित्राने दसऱ्याच्या मेळाव्यातच दिल्या आहेत. तेव्हा मी आडमिट नव्हतो, त्यामुळे मला त्या मिळाल्या नाहीत. असो! आपल्या दोघांत पुरेसे ‘पोलिटिकल डिस्टन्सिंग’ पाळले जात आहे ना, याकडे अनेकांचे लक्ष असते, हे तुम्हाला ठाऊक असणारच. पूर्वी मी लौकर उठत असे. हल्ली पहाट टाळूनच उठतो! नकोच ती बिलामत!! ती पहाटेची शपथ आठवून मी भल्या पहाटे झोपेतून (दचकून) जागा होत असे. हल्ली हल्ली बरी झोप लागू लागली आहे. त्या शपथेच्या आठवणी मी पूर्णत: विसरलो आहे. तुम्हीही विसरा!! लौकर बरे व्हा, आणि महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हा!! कळावे. 
आपला, दादासाहेब

Edited By - Prashant Patil