ढिंग टांग : ना शिकवा , ना गिला..!

ढिंग टांग : ना शिकवा , ना गिला..!

मर मिटेंगे या लुटेंगे हम भी उनका कारवां
कह गये है डर के मारे अब हमारे बाजवा

वजीरे आजम-ए- हिंदोस्तां जनाब नमोसाहब, फास्ट बोलर इमरान का सलाम. उप्पर दिलेला शेर मला स्वत:लाच परवा (बैठे बैठे) सुचला. आमचे लष्करेप्रमुख जनरल बाजवासाहेबांवर मी हा शेर लिहिला. जनाब बाजवासाहेबांना आपण ओळखत असालच. आमचे सरकार तेच चालवतात. युनिफॉर्म पेहनून जनरलसाहब उभे राहिले की कमसे कम एखादा शेर अपनेआप सुचतोच. कल देर रात ते माझ्या गरीबखान्यात आले, आणि त्यांनी हिंदोस्तांबद्दल माझ्याकडे तक्रार केली. त्यावेळी मी मेज-ए-तबला वाजवण्यात थोडा बिझी होतो. ते म्हणाले की, ‘जनाब इमरानसाहब, आप तो बडे सूरमा फास्ट बोलर रहे हैं. एक जमाने में एक भी हिंदुस्तानी बॅट्‌समन आपके सामने टिक नहीं सकता था...लेकिन अब आपको इंडियावाले डरते नहीं ऐसा लगता है. हमारे और आपके बारे में हिंदुस्तानी मीडिया में अनापशनाप बका जा रहा है, और आप यहां तबला बजा रहे हो?’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरअसल बात ऐसी है के, कुछ वख्त पहले हिंदोस्तांचे फायटर पायलट कॅप्टन अभिनंदन वर्धमान (उपरवाला उन्हे और लंबी मूंछें दें!!) हे गलतीसे विमानातून कुदले आणि सरजमीं-ए-पाकवर लॅंड झाले. तेव्हा आमच्या सोल्जरांनी त्यांना ताब्यात घेतले. इंडियन पायलट पकडला आहे, असा संदेसा आल्याबरोब्बर जनरल बाजवासाहेब जोरात किंचाळले , ‘अरे गधों, उसे क्‍यों पकडा? क्‍यों पकडा?’ त्यांच्या पाक बदनला पसीना फुटला. लागलीच त्यांनी मला फोन केला. म्हणाले, ‘जनाब वजीरेआझम, आपल्या फ...फ...फ...फौजने इंडियन फायलट पायटर पकडला आहे. उसे फ..फ..फौरन छोड दिया जाय?’’

फायलट पायटर? किसका? इंडिया का? तो आपल्याकडे का आला? कसा आला? असे बारा सवाल मी त्यांना केले, आणि तेव्हा भयंकर उकडत होते. इसलिये मलाही पसीना फुटला होता. शेवटी आम्ही दोघांनीही भयंकर उकडत असताना निर्णय घेतला, की इंडियन फायटर पायटल कॅप्टन अभिनंदन वर्धमान (उप्परवाला उन्हे और भी लंबी मूंछे दे!) यांना फौरन सोडून देण्यात यावे, इतकेच नव्हे तर वाघा बॉर्डरपर्यंत त्यांना बाइज्जत पोहचवण्यात यावे!

इतका पडोसीधर्म हल्ली कोण पाळते? आम्ही पाळला! लेकिन उसका फल क्‍या मिला? बदनामी, बर्खुर्दार बदनामी! जनरल बाजवासाहेब आणि आम्ही डर के मारे पसीना पसीना झालो, आमचे हातपैर कापून कापून ठंड पडले होते, शेवटी इंडिया हमला करेल या डर के मारे आम्ही कॅ. अभिनंदन (उ. उ. औ. लं. मूं. दे.!) यांना बाइज्जत घरी पाठवले, असा सरासर झूठा इल्जाम आमच्यावर आला. बदनसीबी देखिए जनाब, की आमच्याकडले अपोझिशनवाले याच गोष्टीचा फायदा उठवत हिंदोस्तानच्या मीडियाला खुराक पुरवत आहेत. ये बहोत नाइन्साफी है! इंडियन फायटर पायलटला लौटावताना पतलून-ए- पाकिस्तानचा रंग बदलला, अशी झूठी खबर फैलावण्यात आली आहे. उसका मैं तहे दिलसे मुर्दाबाद (निषेध) करता हूं.

अर्ज किया है- मेरे हमदम मेरे दोस्त, न शिकवा है, ना कुछ भी गिला पतलून के रंग को क्‍या जानो, कुछ नीला है, कुछ..जाने दो ! समझनेवाले को इशारा काफी है.
आप का अपना.
इमरान.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com