ढिंग टांग : एक दरखास्त में सब बरखास्त! (अर्थात भाग्यनगरची मोहीम)

ब्रिटिश नंदी
Wednesday, 2 December 2020

सोब सच्ची सच्वी बोलरेले आपन...सुनो, हैदराबादां की कहानी! ...घोडा फुर्फुरत होता. आगेकूच करण्यासाठी सैन्य सज्ज होते. लष्करप्रमुख नड्डाजी लगबगीने पुढे झाले. ‘शतप्रतिशत प्रणाम’ करुन त्यांनी सरसेनापती मोटाभाईंकडे कूच करण्याची परवानगी मागितली. मोटाभाईंचे लक्ष नव्हते. ते घोड्यावर बसून तोल सांभाळत होते.

सोब सच्ची सच्वी बोलरेले आपन...सुनो, हैदराबादां की कहानी! ...घोडा फुर्फुरत होता. आगेकूच करण्यासाठी सैन्य सज्ज होते. लष्करप्रमुख नड्डाजी लगबगीने पुढे झाले. ‘शतप्रतिशत प्रणाम’ करुन त्यांनी सरसेनापती मोटाभाईंकडे कूच करण्याची परवानगी मागितली. मोटाभाईंचे लक्ष नव्हते. ते घोड्यावर बसून तोल सांभाळत होते. घोडा नाठाळपणे वागत होता...मोटाभाईंनी नुसतेच ‘हुं’ असे केले. लष्करप्रमुख नड्डाजींनी ‘चलो, भाग्यनगर’ असा रणघोष करत घोड्याला टांच दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरसेनापती मोटाभाईंच्या घोड्याचा तेवढ्यात काहीतरी गैरसमज झाला असावा! तो जो उधळला तो थेट भाग्यनगरच्या चार मनोऱ्यांपाशीच येऊन उभा राहिला. मोटाभाईंचे डोके गरगरले. हा घोडा प्रकाशाच्या वेगाने धावतो की काय? एवढी दौड क्षणार्धात मारुन पुरते हैराण झाले होते. घोड्याच्या मानेवर डोके टेकवून त्यांनी थोडी विश्रांती घेतली...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘क्‍या होरा मामू? सोरे क्‍या?,’ कुणीतरी विचारले. मोटाभाईंनी डोळे किलकिले केले. समोर एक अनोळखी इसम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर हैदराबादी मासूमियत होती.
‘किधरसे आये, कहां होना, मामू?’ त्याने विचारले.
‘अमदावाद...सॉरी...दिल्ली!’ जीभ चावून मोटाभाईंनी (घोड्यावरुनच) उत्तर दिले. आपण अहमदवादहून आलो, असे ते हल्ली कुणाला सांगत नाहीत.
‘ कायकू आये ह्यां?,’ हैदराबादी गृहस्थाने म्यारेथॉन मुलाखतच सुरु केली. ते तिथले मुलाखतकार संपादक किंवा गेलाबाजार सुधीर गाडगीळ तरी असणार! काही लोकांना मुलाखत घेण्याची खोड असते.
‘भाग्यनगरना भाग्य लखवामाटे...’ मोटाभाईंनी शाब्दिक जुळवाजुळव सुरु केली. है. गृ.चे कुतूहल काहीच्या काहीच चाळवले. ‘क्‍या होरा बोले? पेट में गुरगुर होरी क्‍या?’ त्याने काळजीपोटी विचारले. तेवढ्यात लष्करप्रमुख नड्डाजी आणि सूरमा सरदार आदित्यनाथ तेथे घाम पुसत येऊन पोचले. आपली संपूर्ण पलटण भाग्यनगर दिग्विजयाच्या मोहिमेत उतरल्याचे पाहून मोटाभाईंच्या जीवात जीव आला.

‘इथली निजामशाही आणि घराणेशाही संपवायला आलोय! तुमच्या हैदराबादचा विकास करुन द्यायला आलोय! या भाग्यनगराचं भाग्य बदलायला आलोय!’ सरसेनापती मोटाभाईंनी घाईघाईत आपल्या येण्याचा हेतू सांगितला. त्यावर नड्डाजी आणि आदित्यनाथ यांनी ‘भाग्यलक्ष्मी की जय हो’ असा नारा दिला.
‘ये आपके पोट्टे है क्‍या?’ है. गृ.ने विचारले. आपल्याला पोट्टा म्हटल्याचे नड्डाजी आणि आदित्यनाथजी या दोघांनाही आवडले नाही. हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर केले नाही तर नावाचा पोट्टा नाही, असा संकल्प त्यांनी तिथल्या तिथे सोडला.
‘अर्रर्र...आइसा कुच्च मत करना! ये कमलवाले लोगां ह्यां आते आऊर आईसीच्च बडी बडी बातां करते! मामू, तुम उनके माफिक बैंगन की बातां नक्को कर,’ है. गृ. ने मान हलवत, जीभ काढत मोफत सल्ला दिला. सरसेनापती मोटाभाईंना मोठे आश्‍चर्य वाटले. या लोकांना
विकास नकोसा झाला आहे? कमालच झाली!
‘विकास की गंगा बह रही है. बहते बहते यहां आ गई है! हम जो कहते हैं, करते हैं! इस नगर के विकास की जिम्मेवारी अब हमारी है!...मोटाभाईंनी ठरल्याप्रमाणे ४५ मिनिटे सारे काही ऐकवले. है. गृ. हैराण झाला.
‘क्‍या करते है, की क्‍या की...’असे टिपिकल हैदराबादी उद्गार काढून है. गृ.ने आपला क्षीण निषेध नोंदवला, आणि तो तिथून चालता झाला.
चार मिनारां की कसम, भाया!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on dhing tang