esakal | ढिंग टांग : नाताळगीत!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

सांताबाबा, सांताबाबा भेट नाही झाली
रात्री केव्हा येऊन गेलां, टोटल नाही लागली
झोप लागली गाढ आम्हा, लागला नाही ठाव
तुम्ही कधी येऊन गेलां, कळलंच नाही राव

ढिंग टांग : नाताळगीत!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

(चाल : जिंगल बेल)
सांताबाबा, सांताबाबा भेट नाही झाली
रात्री केव्हा येऊन गेलां, टोटल नाही लागली
झोप लागली गाढ आम्हा, लागला नाही ठाव
तुम्ही कधी येऊन गेलां, कळलंच नाही राव

सॉरी, सॉरी सांताबाबा, झोप लागली गाढ
गोळी घेऊन झोपलो होतो-दुखत होती दाढ
तुम्ही खरंच येणार हे कळलं असतं तर,
जागत बसलो असतो आम्ही नक्की रात्रभर

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सॉरी सॉरी सांताबाबा, झाली चुकामूक
भेट हुकली आपली-तुपली, झाली धाकधूक
एकदा सांगा बाबा, नक्की आला होता ना?
येतो, येतो सांगून शेंडी लावली नाहीत ना?

सकाळी उठून बघतो तर मोजा होता खाली
भेटवस्तू नाही, नव्हत्या चाकलेटांच्या साली!

मोजा होता धुतलेला अन नव्हता त्याला वास
नाक मुठीत धरुन त्याच्यात भेट ठेवायची खास!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

किती वर्ष ऐकत होतो, सांताबाबा येणार
हरणांच्या गाडीत बसून आता अवतरणार
हाहा हीही होहो हेहे खुखु खॅखॅ खीखी
हसतखेळत ऐकत होतो तुमची आंखोदेखी

आभाळातून येई गाडी, घणघण वाजे घंटी
सांताबाबा येणार म्हणून जागत बसतो बंटी
लाड ड्रेस, शुभ्र दाढी, पाठीवरती पोते
मिशाळजीच्या ओठांवरती सुरेल नाताळगीते

जिंगल बेल, जिंगल बेल जिंगल ऑल वे
सांताबाबा गाणे गातो त्याचे सूर नवे
नवा देश, नवा वेश, नवी नूतन स्वप्ने
नव्या सांताबाबाची जुनी आश्वासने!

सांता म्हणे, ‘काय देऊ तुला सांग आज
गिफ्ट नको, कर्ज घे ना, कमी घेईन व्याज
रोगराई गाडून टाकीन, थांबविन सारी लूट
कर्ज म्हणजे खरी गिफ्ट बाकी सारे झूट

कर्ज घेऊन कर लेका स्वप्न तू साकार
तूच आहेस जीवनाचा खरा शिल्पकार
यालाच म्हंटात सुख आणि हेच ते अच्छे दिन
मूठ वळून म्हण मनात ‘यु कॅन आल्सो विन’!

सालाबाद न चुकता येतो बाबा सांता
उडत जाते दु:ख सारे, उडती साऱ्या चिंता
ओढाळ आमचे मन तिथे शोधते दिलासा
जरी आमचा मोजा खाली, रिता आहे खिसा!

Edited By - Prashant Patil

loading image