dhing tang
sakal
बेटा : (नेहमीप्रमाणे अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (पक्षकार्यात खाली मान घालून मग्न…) हं!
बेटा : (खोडकरपणाने डोक्यावर टोपली घेत) म्हावरां घ्या, म्हावरां…ताजी ताजी म्हावरांऽऽ..!
मम्मामॅडम : (कामात बिझी…) व्हॉट इज म्हावरा बेटा?
बेटा : (जनरल नॉलेज देत) म्हावरा मीन्स नुस्ते, मासे, फिश..!!
मम्मामॅडम : (खालमानेनंच नाक वाकडं करत) तरीच मघापासून मासळीचा वास येतोय!
बेटा : (हातातली टोपली पुढे करत) यह देखो मां, मैंने तुम्हारे लिए क्या लाया है!
मम्मामॅडम : (नाकाला पदर लावून) फिश मार्केटमध्ये जाऊन आलास की काय? फिश कशाला आणलंस? आणि एवढा ओला कशानं झालास? छे, कपडे बदलून घे बरं, सर्दी होईल!!
बेटा : (सद्गदित सुरात) मम्मा, यह मछलियां मैंने मेरे हाथों से पकडी है!! देखो, देखो!!
मम्मामॅडम : (संशयानं) उगीच काहीतरी! फिश मार्केटात जाऊन आणलंस ना? काय पडला भाव?
बेटा : (टोपली खाली ठेवत सात्विक संतापानं) कष्टाचं चीज या पक्षात होत नाही, हेच खरं! मी स्वत: जाळ्यात पकडल्या या मासोळ्या! मछवारांच्या सोबत पाण्यात कुदलो! बुड्या मारुन मारुन मी स्वत: पकडले आहेत हे मासे!!
मम्मामॅडम : (दोन्ही गालांवर हात ठेवून शहारत) कशाला हे करतोस हे उद्योग? मला बाई, भारी काळजी वाटते…
बेटा : (चेवात येत) काल बिहारमध्ये बेगुसराय नावाच्या एका गावात तेजस्वीभय्याचा प्रचार करत होतो! तिथं एक तलाव दिसला, काही मछुवारे मासे पकडत होते! मी छोट्या नौकेतून गेलो, आणि त्यांची चौकशी केली! मच्छिमारांचं जीवन जाणून घेतलं! (फिल्मी स्टायलीत) तुम्हे पता है नं मम्मा, मैं मिट्टी, पानी और परंपरा से जुडा हुआ इन्सान हूं!..
मम्मामॅडम : (नाराजीनं) तू मतं पकडायची सोडून मासे का पकडायला गेलास, ते सांग आधी!!
बेटा : (सपशेल दुर्लक्ष करत) मैं मछलियों की बहुत इज्जत करता हूं! मी छोट्या नौकेतून तलावात गेलो! पाण्यात बघितलं तर एक भलामोठा मासा माझ्याकडे बघून गोड हसत होता! मी त्याच्याशी मैत्री करण्यासाठी थेट तलावातच उडी घेतली! पाण्यात गेलो तर तो भलामोठा मासा नव्हताच!!
मम्मामॅडम : (आश्चर्यानं) ओह गॉड!
बेटा : (खुलासा करत) ते माझंच प्रतिबिंब होतं! हाहा!! अशी झाली गंमत!
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) आता या माश्यांचं मी काय करु?
बेटा : (आत्मविश्वासाने) मम्मा, माझं ठरलंय!! मी यापुढे परदेशात सुट्टीवर नाही जाणार! इथेच मासे पकडणार!! भारतीय मच्छिमारांसाठी मी जीवन व्यतीत करणार!
मम्मामॅडम : (संयमानं) डोसेवाला दिसला, डोसे घालून बघ! जिलेबीवाला भेटला, जिलेब्या घालून बघ! ट्रकवाल्यांबरोबर ट्रक चालवून बघ! हमालांसोबत गेलास की, बॅगा डोक्यावर घेऊन बघ…हे काय चालवलं आहेस? यामुळे मतं मिळतात का?
बेटा : (आठवण करुन देत) मी एकदा सूर्यनमस्कारही घालून दाखवले होते, आणि एकदा भजीसुध्दा तळली होती, आठवतं? (नर्सरी ऱ्हाइम म्हणत) कमॉन, सिंग अलाँग…मछली जल की रानी है! जीवन उसका पानी है! हाथ लगाओ तो डर जायेगी! बाहर निकालो तो मर जायेगी! पानी में छोडो तो तैर जायेगी..!
मम्मामॅडम : (मटकन खुर्चीत बसत) आपल्या पक्षाची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी झाली आहे, त्याचं काय करायचं बेटा?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.