dhing tang
sakal
आजचा दिवस : विश्वावसु संवत्सरे श्रीशके १९४७ कार्तिक मासे शुक्ल चतुर्दशी दिवसे.
आजचा वार : मंगळवार
आजचा सुविचार : ऐन दुपारी यमुनातीरी खुर्ची माझी मोडली, मोडली, मोडली…!
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) तसा मी अतिशय सावध मनुष्य आहे. ताक फुंकून पितो. चहा थंड करुन पितो. फ्रीजमधले पाणी थोडावेळ बाहेर काढून ठेवतो, मगच पितो. नाहीतर सर्दी होते. पाणीपुरी खातानाही जपूनच खातो. नाहीतर घशात टोचते. कुणाला भेटायचे असेल तर जपूनच बोलतो. एवढा सावध असूनही एका भीषण दुर्घटनेतून काल बालंबाल बचावलो. तो थरार आठवला तरी अजून अंगावर काटा येतो…