ढिंग टांग : दिल का करार हो गया..!

वि. सू. : पुढल्या वर्षीच्या नोबेलसाठी पुन्हा ट्राय करीन, असं म्हणतोय. यावेळी तरी खोडा घालू नका!
India Trade Deal

India Trade Deal

sakal

Updated on

फ्रॉम द डेस्क ऑफ-

धी हॉनरेबल प्रेसिडेंट ऑफ

युनायटेड स्टेस्ट्रस ऑफ अमेरिका,

व्हाइट हाऊस, १६००, पेनसिल्वेनिया अवेन्यू,

डीसी, वॉशिंग्टन.

मा य डिअरेस्ट फ्रेंड, फिलोसॉफर अँड गाइड, मि. नारिंड्रा, हे गोपनीय पत्र तुम्हाला चांगल्या आरोग्यात (गुड हेल्थ) मिळेल, अशी आशा करतो. गेले कितीतरी दिवस ज्याच्यासाठी आपण डोके (एकमेकांच्या) डोक्यावर घासले, ते ट्रेड डील अखेर पार पडले, याचा प्रचंड आनंद (ग्रेट प्लेजर) मला झाला आहे. हा करार करताना आपण एकंदर सोळा वेळा आलिंगन, दोनशे बत्तीस वेळा हस्तांदोलन केले, असा रिपोर्ट मला आमच्या सीआयएनं दिला आहे. दॅट्स अ ग्रेट एफर्ट, इजंट इट?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com