लंच : दिल्लीत अचानक येऊन पोचलो, तेव्हा जवळजवळ लंच टाइम झाला होता. दिल्लीत साधारणपणे दुपारी तीन-साडेतीन हीच लंचची वेळ आहे. बरोब्बर तीच वेळ गाठून सर्वशक्तिमान श्री. मोटाभाईंच्या घरी पोचलो. मोटाभाई वाट पाहात बसले होते. माझ्याकडे बघून ते म्हणाले की, देवेनभाईनं मला तुम्ही येणार याची कल्पना दिली होती. मी लंच तयार ठेवलाय. जेवून घ्या!’