esakal | ढिंग टांग : हंगामा ते हंगामी!
sakal

बोलून बातमी शोधा

congress

आपल्या पक्षात खरीखुरी लोकशाही आहे! प्रत्येकाला आपलं मत नोंदवण्याचा अधिकार आहे! आपलं त्या कमळवाल्यांसारखं नाही!! दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे! जिसको चाहिए, वो अपनी बात खुलकर रख सकता है...इसेही लोकतंत्र कहते है...हैं ना?

ढिंग टांग : हंगामा ते हंगामी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण..मम्मा, आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (कौतुकानं स्वागत करत) वेलकम! 

बेटा : (उत्सुकतेनं) दीदी कुठे आहे?

मम्मामॅडम : (प्रेमभराने) येईलच इतक्‍यात! तेवढ्यात मी मस्तपैकी पास्ता घेऊन येते!

बेटा : (दुर्लक्ष करत) आज धमाल आली नाही? कार्यकारिणीच्या बैठकीत?

प्रियांकादीदी : (दोन्ही हात उंचावत एण्ट्री) योऽऽ...! लो, मैं भी आ गई!

मम्मामॅडम : (कृतार्थ मुद्रेने) आजचा दिवस खरंच चांगला उगवला आहे! सकाळी सकाळी मलासुद्धा मोराचं दर्शन झालं होतं!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बेटा : (हळहळत ) कमॉन! मग ट्‌विटरवर का नाही टाकलंस? संधी घालवलीस!!

मम्मामॅडम : (नाक मुरडत) असे हजारो मोर बघितलेत मी! हॅ:!!

प्रियांकादीदी : (गंभीरपणे) मम्मा, काँग्रॅच्युलेशन्स! आप फिरसे हंगामी अध्यक्ष चुनी गई!!

मम्मामॅडम : (नेमस्तपणे) थॅंक्‍यू!!

बेटा : (श्रेयवादाची लढाई...) माझ्यामुळे हा दिवस दिसतोय..डोण्ट फर्गेट!

प्रियांकादीदी: (कपाळाला आठी घालत) पण आपल्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी ते पत्र पाठवायला नको होतं! मला रागच आला!

मम्मामॅडम : (सहजपणाने घेत) कुठलं पत्र? काहीतरीच तुझं!

प्रियांकादीदी : (चिडक्‍या सुरात) तेच...नेतृत्वबदल करा असं सुचवणारं! भलतेच आगाऊ आहेत, आपले नेते!!

बेटा : (संतप्त मुद्रेनं धुमसत) मला तर इतका राग आला की...की...ऑनलाइन बैठक होती म्हणून! नाहीतर-

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मम्मामॅडम : (समंजसपणे) जाऊ दे रे! आपल्या पक्षात खरीखुरी लोकशाही आहे! प्रत्येकाला आपलं मत नोंदवण्याचा अधिकार आहे! आपलं त्या कमळवाल्यांसारखं नाही!! दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे! जिसको चाहिए, वो अपनी बात खुलकर रख सकता है...इसेही लोकतंत्र कहते है...हैं ना?

प्रियांकादीदी : (सीरिअस चेहऱ्यानं) तरीही त्यांनी ते पत्र पाठवायला नकोच होतं! 

बेटा : (तळहातावर मूठ आपटत  संशयानं) मला तर फुल डाऊट आहे, हे पत्र पाठवण्यामागे ते कमळवालेच आहेत! कारस्थान आहे हे, कारस्थान!

मम्मामॅडम : (थंडगार आवाजात) काहीही बोलले तरी ते आपले जुने सहकारी आहेत हे विसरू नकोस! माझ्या मनात कुणाच्याहीबद्दल दुजाभाव नाही की किल्मिष नाही! आपल्याविरूद्ध पत्र लिहिलं आणि ते मीडियाला दिलं म्हणून मी बिलकुल रागावलेले नाही! मी काही कुणाचा सूड घेणार नाही की भीती दाखवणार नाही!

प्रियांकादीदी : (थक्क होत) खरंच असं वाटतं तुला?

मम्मामॅडम : (बर्फाळ सुरात) अर्थात! किसी को डरने की जरुरत नही है! 

बेटा : (खो खो हसत) काल आपल्या नेत्यांनी आधी मारे पत्र लिहिलं, मग ‘ट्‌विटर’वर काहीबाही लिहिलं! नंतर सगळंच गुंडाळून ठेवलं! एकदम  आपण तिघं समोर आल्यावर काय करणार हे लोक? हाहा!! अरे, या पक्षात काही लोकशाहीबिकशाही आहे की नाही?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रियांकादीदी: (धोरणीपणाने) पण आपल्याला आता सावध राहायला हवं! इतने बडे हंगामे के बाद हंगामी यश मिला है हमें! 

बेटा : (बेफिकिरीने) कुछ नहीं होगा! मैं हूँ ना!!

प्रियांकादीदी : (पुढले हिशेब जुळवत) पण कुणावर तरी कारवाई करावीच लागणार!

मम्मामॅडम : (शांतपणे) हे सगळं त्या मोदीजी व अमितजींमुळे झालं! आपला पक्ष नष्ट करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे ना!

बेटा : (चुटकी वाजवत) आपण त्यांच्यावरच पक्षविरोधी कारवायांबद्दल नोटीस बजावली तर? कशी वाटतेय आयडिया?

loading image