फ्रॉम द डेस्क ऑफ-धी हॉनरेबल प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, व्हाइट हाऊस, १६००, पेन्सिल्वानिया, वॉशिंग्टन डीसी.
हे देअर…माय डिअर फ्रेंड मोदी द नाइस मॅन!, माझं निमंत्रण डावलून तुम्ही वेळेत घरी पोचला असाल अशी आशा आहे. माझं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं असतं तर जगासाठी बरं झालं असतं. उगाचच माझा मूड बिघडला, आणि त्या इराणला भोगावं लागलं. तुमच्यासाठी खास तुमच्या मेलानियाभाभीने पहिल्यांदा घरच्या घरी ढोकळा ट्राय केला होता.