वंदनीय माननीय श्री. फडणवीसनानासाहेब, यांसी लाख लाख दंडवत. बैठकीला भेटलो की मी नेहमी तुमच्याकडे बघून नमस्कार करतो. मगच खाली बसतो. तुम्हीही माझ्याकडे बघून गोड हसता. मला बरे वाटते. तुमच्या या हसऱ्या स्वभावामुळे सुरवातीला गैरसमज झाला. नामदार झाल्यावर आपल्याला नानासाहेबांची मर्जी असल्यामुळे सगळ्या सोयीसुविधा फटदिशी मिळतील, असे वाटले होते.