सभेला गर्दी बरीच होती. उत्स्फूर्त होती. बिस्लेरीच्या बाटल्या, वडापाव आणि बिर्याणीची पाकिटे न देता, कुठलाही ट्रान्सपोर्ट न घेता एवढे शेपटीवाले प्राणी जमा झाले, हे एक आश्चर्यच होतं. एरवी पावाच्या तुकड्यासाठी एकमेकांचे लचके तोडायला मागेपुढे न पाहणारे सडकछाप कुत्रेही इमानदारीत आले होते.