
dhing tang
sakal
ताठरुन लाकूड झालेल्या कलेवरांच्या
सडक्या मांसाचा दुर्गंध
तिच्या नासिकेपर्यंत पोचला नाही.
घिरट्या मारत सुग्रास प्रेतांवर
झेपावणाऱ्या गिधाडांचा कल्लोळ
तिच्या कर्णेंद्रियांना जाणवला नाही.
इतस्तत: पडलेली रथांचे चाके, मोडकी अस्त्रे,
आणि निरुपयोगी ठरलेले शिरस्त्राणांचे भंगार
तिच्या डोळ्यांना खुपले नाही.
कुरुक्षेत्राच्या सीमेवर रथालाच रेलून
पाठमोऱ्या उभ्या कुंतीमातेच्या मुद्रेवर
नव्हते कुठलेच विकार.
ना दु:खाचे अश्रू. ना प्रतिशोधाचे स्मित.
ना मृत्यूच्या प्रलयंकारी तांडवाचे भय.
तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नव्हता…