श्रावणातली टळटळीत दुपार. मुदपाकखान्यातून कुकरची शिट्टी ऐको आली, पाठोपाठ कारल्याची भाजी परतल्याचा गंध दर्वळला. राजियांनी नेत्र घट्ट मिटोन घेतले. आता महिनाभर हेच ग्रहण करायचे….हर हर हर हर!! गवाक्षातून बाहेर नजर टाकत राजियांनी ताबडतोब आक्रमणाची मसलत मनोमन सुरु केली. औंदा मैदान मारायचेच. काहीही होवो, शेंडी तुटो, वा पारंबी!