नाही कधी का तुम्हास म्हटलं,बघू नका टकमका,अहो, राया मला रिकामं ठेवू नका ॥धृ.॥.बसुनी बसुनी अंग आंबलेझोपा काढुनि अगदी शिणलेदेत जांभया मी बया बसलेउभ्या कुडीला लागंल वारुळ, काहीतरी तुम्ही शिका,अहो, राया मला रिकामं ठेवू नका ॥१॥.साहेब, अस्सल मी मधमाशीमतलब माझा हाय मधाशीतरीही बसल्ये घरीच उपाशीमोहोळावरती कुणी बाजिंदा दगडी हानितो बघाराया, मला रिकामं ठेवू नका ॥२॥.चुकलं माकलं धरा जी कानठेवीन तुमचा मी मान पानरांधून घालीन तुम्हांस छानदोघे मिळुनी कामां लागुन, दुसऱ्यांस देऊ ढकाराया, मला रिकामं ठेवू नका ॥३ ॥.ठेवू नका मज अशी रिकामीबसुनी होईन मी कुचकामीकिती दवडाव्या संधी नामीरिक्तपणाच्या दारावरती, सैतानाच्या हाकाराया, मला रिकामं ठेवू नका ॥४॥- प्रशिध्द शाहीर धनाजीराव, बीड..प्रिय आदरणीय साहेब, सप्रेम जय महाराष्ट्र. गेले काही महिने रिकामपणानं बिझी गेले. कोण काय करतं, आणि आम्हाला भोगावं लागतं. कशाला काही संबंध नसताना आमची खुर्ची गेली, हातातलं कामही गेलं. काही चुकलं असंल तर माफी करा, कान पकडा, पण असं रिकामं ठेवू नका, येवढीच हात जोडून विनंती आहे..कर्जतच्या सत्काराच्या वेळी मी आपल्यापाशी गाऱ्हाणं मांडलं होतं. पण मनाचं समाधान हुईना. अस्वस्थपणातच अचानक मला लावणी स्फुरली. तीच येथे देत आहे. या लावणीगीतात मी माझ्या मनाची घालमेल मांडली आहे. कृपया ऐकावी. लावणी बैठकीची असली तरी, हवं तर मी स्वत: येऊन (उभ्यानं) म्हणून दाखवीन!!.तेवढी कृपा करा, आणि हाताला काम द्या. बेरोजगारी सहन होत नाही. घराबाहेर फिरताना नाकी नव येतात. बाजारच्या रस्त्यानं परवा जात होतो, तेव्हा एका मतदारानं आपुलकीनं विचारलं, ‘भाऊ, हल्ली काय करता?’ काय उत्तर देऊ? जीव कसनुसा झाला आहे. काहीतरी मार्ग काढून मला लौकरात लौकर बिझी करावे, ही विनंती. मी पक्षासाठी आधी काहीही करत होतो, पण आता काहीच्या काहीही करीन. कळावे.आपला विनम्र (शाहीर धनाजीरावभाऊ, बीड).प्रिय धनाजीराव यांना, काळजी करु नका. कर्जतच्या सत्काराच्या वेळी तुम्ही केलेली मागणी वरिष्ठांच्या कानावर घातली आहे. ते लौकरच तुम्हाला काम देतील. पण ‘आपला पक्ष काय स्काऊटच्या पोरांचा आहे का?’ असेही त्यांनी मला ऐकवले आहे. तुम्ही आधी बिझी होता, आणि आता रिकामे आहात, हे ऐकून आश्चर्यच वाटले. आपल्या पक्षातले बाकीचे नामदार, आमदार कामात बिझी आहेत, हे तुम्हाला कोणी सांगितले? आम्ही सगळेच सध्या रिकामे आहोत. तेव्हा जे ताटात, तेच वाटीत आहे!! काळजी नसावी. वाट पहा.आपला. सु. तटकरे, अध्यक्ष (सध्या बिझी.)ता. क. : बाकी लावणी फर्मास जमली आहे. ‘राया मला पावसात नेऊ नका’च्या चालीवर दिवसभर गुणगुणत आहे. चालू द्या!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.