

मुंबईत प्रचंड उकडत होते. विशेषत: भांडुप परिसरात तर खूपच गरम होत होते. तेही डिसेंबरात. हा महिना मुंबईत थंडीचा महिना मानला जातो. मानावाच लागतो. मुंबईतला थंडीचा महिना म्हणजे पंखा ऑनवरुन तीनवर चालवणे, इतकाच असतो. पण यावेळी असह्य झाले. महाविकास आघाडीचे सरकार टिकले असते तर भांडुपला बर्फवृष्टी होईल, अशी व्यवस्था करता आली असती.
पण नतद्रष्ट मतदारांनी…(पुढील अक्षरे लागत नाहीत. खाडाखोड दिसते.)