
हौस ऑफ बांबू
नअस्कार! उदाहरणार्थ मला क्रांतिअग्रणी डॉ. भालचंद्रजी नेमाडेजींबद्दल सारखं सारखं बोलायला, लिहायला वगैरे आवडत नाही. पण ते गप्प बसले तरी बातमी होते. त्यांचा ‘सट्टक’ काव्यसंग्रह सध्या चिक्कार गाजतोय. अफलातून कविता आहेत, आणि मी त्यातल्या रोज थोड्या थोड्या कविता वाचतेय. मराठी साहित्य मुलुखात सध्या ‘सट्टक’ची हवा आहे. जो येतो, तो नेमाडेसरांची स्वाक्षरी असलेली प्रत उचलून नेतो आहे. कमालच केली ‘सट्टक’नं!!