ढिंग टांग : माय नेम इज…तुलसीभाई!

म्हारा प्रिय मित्र नमोभाईने सतप्रतिसत प्रणाम. बप्पोरेच घरी परत आलो. प्रवास चांगला झ्याला. प्रवासातही सारखा ढोकळा आणि खमणीची याद येत होती.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

म्हारा प्रिय मित्र नमोभाईने सतप्रतिसत प्रणाम. बप्पोरेच घरी परत आलो. प्रवास चांगला झ्याला. प्रवासातही सारखा ढोकळा आणि खमणीची याद येत होती.

म्हारा प्रिय मित्र नमोभाईने सतप्रतिसत प्रणाम. बप्पोरेच घरी परत आलो. प्रवास चांगला झ्याला. प्रवासातही सारखा ढोकळा आणि खमणीची याद येत होती. तुम्ही बांधून दिलेले बारा ठेपले (अने अचार) प्रवासात उडवले! थँक्यू सो मच. अहमदाबादच्या आठवणी मनातून जाता जात नाहीत. यंदाचा भारत दौरा माझ्याच नव्हे, तर साऱ्या जगाच्या लक्षात राहील. मी तेथे टेड्रोस आढानोम घेब्रेसेयुस म्हणून गेलो, आणि येताना तुलसीभाई बनून आलो- तुलसीभाई! नुसते नाव घेतले तरी कानावरुन मोरपीस फिरवल्यासारखे वाटते. मी पक्का गुजराथी बनल्यामुळे तुम्ही मला हे नवे नाव दिले. तु-ल-सी-भाई! वॉव!! या नामकरणामुळे माझे आयुर्मान किमान त्रेचाळीस वर्षांनी वाढले. (सध्या मी ५८ रनिंग आहे…) असो.

आमच्या इथिओपियामध्ये मलेरिया, इबोला, एड्स असे बरेच रोग होते. त्या रुग्णांचे दु:ख निवारण करण्यासाठी मी आयुष्य वेचले. पुढे ‘डब्ल्यूएचओ’ चा प्रमुख बनलो. तरीही लोक मला ‘हू आर यु?’ असेच विचारत. आता मी या प्रश्नाचे उत्तर अभिमानाने देईन. – ‘‘आयम तुलसीभाई!’’ टेड्रोस आघामोन घेब्रेयुसस हे काय नाव झाले? तुम्ही ‘राजूभाई’ किंवा ‘ केसुभाई’ टाइपचे नाव ठेवले असते, तरी मी ते आनंदाने स्वीकारले असते. टेड्रोस वॉज टू मच! पुन्हा असो.

नमोभाई, तुस्सी ग्रेट हो! मला पाच मुले आहेत. त्यांचीही नावे बदलायची इच्छा आहे. सुचवाल का? कळावे.

आपला परममित्र. तुलसीभाई. (डब्ल्यूएचओ)

ता. क. : मुंबईमध्ये बांदरा नावाच्या उपनगरात डब्ल्यूएचओचे एक सल्लागार राहतात. त्यांनाही मी पत्र टाकून माझे नवे नाव कळवले आहे. त्यांचे नाव तुम्ही बदलले नाही ना?

माय डिअर फ्रँड तुलसीभाय, केम छो! मजा मां? अरे, तुम्ही आमचे गुजराथमदी आला, केटला मझा आला! मी तुमच्या नाव चेंज केला, कारण टेड्रॉस आघानोम घेब्रेयुसस असा नाव घेयाला बहु टेन्सन येत होता. आमच्याकडे (माने गुजरात मां) येणाऱ्या अतिथीच्या नाव बदलून टाकायच्या काम मी हमेशा करते. फोर एग्झांपल, अमेरिकाच्या प्रॅसिडेंट डोनाल्ड ट्रम्पच्या नाव बदलून मी ‘डोलांड’ केला होता, अने छेल्लावखत चायनामधून माझा फ्रेंड शी जिनपिंग आला होता, तेव्हा त्यांच्या नाव बदलून पण मी ‘शिरीसभाई’ केला होता. तुमच्या तुलसीभाई करुन टाकला. शुं मज्जानुं वात!! तुमच्या पांच मुलांच्या नाव असा ठेवा : ज्येष्ठमध, लौंग, इलायची, सौंठ अने हलदी! कसा वाटला? बध्दा मळीने सरस काढा बने छे!! सांभळ्यो? जे श्री क्रष्ण.

आपडा. नमोभाई.

ता. क. : बांदऱ्याच्या ‘डब्ल्यूएचओ’च्या सल्लागार आपडाज नान्हाभाई छे! एना नाम बदलवानी हवे जरुरत नथी!!

डिअर मि. मोदी, गुड मॉर्निंग, काल रात्री दिल्ली विमानतळावर उतरलो. तुम्ही गुजराथमध्ये आहात असं कळलं. मी तसाच दुसऱ्या विमानाने अहमदाबादला पोचलो. इथे आलो तर कळलं की तुम्ही पुन्हा दिल्लीला गेलात!! थोडक्यासाठी चुकामूक झाली. परिणामी आजचा दिवस साबरमती आश्रमात सूतकताईत घालवला. ढोकळा नावाचा एक खारट केक खाल्ला. ठेपला नावाचे काही पॅनकेकही उडवले! पत्र लिहिण्यास कारण की, माझे बोरिस जॉन्सन हे नाव बरे आहे! कृपा करुन ते बदलून बालाभाई किंवा बोराभाई असे करु नये! उपकार होतील!

कळावे.

आपला बोरिस जॉन्सन (पीएम, यूके)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com