ढिंग टांग : फकिर आणि मर्सिडिझ! (...एक बोध-बडबडगीत!) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : फकिर आणि मर्सिडिझ! (...एक बोध-बडबडगीत!)

ढिंग टांग : फकिर आणि मर्सिडिझ! (...एक बोध-बडबडगीत!)

पारावर बसून बोले काही बाही

कुणी काही दिलं तर- घेत नसे.

पोटभरुन आशीर्वाद मात्र -देत असे.

फकिरबाबांचा संदेश एकच :

‘सबका साथ, सबका विकास...सबका विश्वास!’

गावात पाण्याचं होतं दुर्भिक्ष्य,

गावकरी होते फार संत्रस्त

दुकानदारांचे मापात पाप,

पाचवीला पुजली होती ओढघस्त.

फकिरबाबांनी गावात ओढाच आणला,

म्हणाले : ‘‘बुझाओ प्यास!’’

गावकरी म्हणाले : ‘‘फकिरबाबा, जिंकलास, जिंकलास!’’

फकिरबाबांचं सांगणं एकच :

‘‘सबका साथ, सबका विकास...सबका विश्वास!’’

पाणी नाही, म्हणून प्रत्येक गावकरी

आंघोळीलाच बुट्टी मारी!

सकाळ झाली की डबा घेऊन

होत असे रानभरी!

फकिरबाबांनी गावात स्वच्छतागृह बांधलं,

गावकरी म्हणाले : फकिरबाबा, जमलं!

फकिरबाबांचं सांगणं एकच :

‘‘सबका साथ, सबका विकास...सबका विश्वास!’’

फकिरबाबांच्या आशीर्वादानं

घराघरात खेळली वीज

फकिरबाबांच्या अंगाऱ्यामुळे

बरे झाले चाळीस मरीज

फकिरबाबांनी गावातली बदलून टाकली हवा

गावकरी म्हणाले : वाहवा, वाहवा!

फकिरबाबांचं सांगणं एकच :

सबका साथ, सबका विकास...सबका विश्वास!

कृतज्ञतेनं गावकऱ्यांनी

बाबांना दिली छोटीशी भेट

नम्रपणाने नाकारुन बाबांनी

उलट दिले की इंटरनेट!

‘यही है भविष्य, ले लो,’ म्हणाले,

गावकरी म्हणाले : भले, भले!

फकिरबाबांचं सांगणं एकच :

सबका साथ, सबका विकास...सबका विश्वास!

फकिरबाबांना काही नको,

राजवाड्याचा सेट नको,

थैलीमधली भेट नको

कसला ‘वधारो’ रेट नको

फकिरबाबांची एकच झोली

गावकरी म्हणाले : यही साधू, यही वली!

फकिरबाबांचं सांगणं एकच :

सबका साथ, सबका विकास...सबका विश्वास!

एक दिवस फकिरबाबांकडे

तरंगत आला मर्सिडिझचा तारा

पाठोपाठ मोटारगाडी

किंमत तिची करोड बारा!

गाडीमध्ये बसून त्यांनी हात हलवला झकास

गावकरी म्हणाले एका सुरात :

सबका साथ, सबका विकास...सबका विश्वास!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top