ढिंग टांग : आ गुजरात में बनाव्यु छे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

प्रात: वंदनीय थोर प्रधानसेवक नमोजी मोरांना दाणे टाकण्यात मग्न आहेत. आपल्या घराकडे अवेळी खिडकीवर कोकलून जाणारे कावळे तेवढे असतात.

ढिंग टांग : आ गुजरात में बनाव्यु छे!

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, देल्ही. वेळ : बप्पोरे.

प्रात: वंदनीय थोर प्रधानसेवक नमोजी मोरांना दाणे टाकण्यात मग्न आहेत. आपल्या घराकडे अवेळी खिडकीवर कोकलून जाणारे कावळे तेवढे असतात. नमोजींकडे मोर येतात. ‘ऑ ऑ ऑ ऑ…असे त्यांना पुकारत नमोजीभाई दाणे टाकत आहेत. बंगल्याच्या पायऱ्यांवर गुडघे चोळत माननीय मोटाभाई बसले आहेत. त्यांचे लक्ष नमोजीभाईंच्या दिवसभराच्या गुजरात दौऱ्यावर आहे. गुर्जरभूमीत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चूंटणी आहे. त्या चूंटणीत रेकोर्डब्रेक व्होट मिळवणे, हे त्यांचे ब्रीद आहे. पण नमोजीभाई मोरांपासून दूर झाले तरच ते शक्य आहे. म्हणून ते काळजीत! अब आगे…

मोटाभाई : (दिवसभराच्या लिखित कार्यक्रमाच्या कागदाकडे नजर टाकत) आजे आपडे जंबुसार मां जावानुं छे! कच्छ ना एरिया तो लगभग थई गया! वडोदरा मां बे-त्रण मीटिंग करीने काम तमाम करवानी कोसीस छे! आपडे निकळीये हवे…(इथे मोर रागारागाने मोटाभाईंकडे पाहतात.)

नमोजीभाई : (मोरांना उद्देशून) आ मोरलोगनीं जिंदगी बहु सरस! कछु काम नथी, कछु जिम्मेवारी नथी! ना व्होटिंग, ना चूंटणी! ऑ ऑ ऑ ऑ…

मोटाभाई : (हेका न सोडता) आपडे जईये, नमोजीभाई! च्यालो ने…(एक मोर भडकलाय! )

नमोजीभाई : (उदासपणे) मारा मन लागतो नथी, मोटाभाई! आ गुजरातमाटे हुं केटला अपमान सहन कऱ्यु!! (डोळ्यातले अश्रू लपवत) आ लोगोंने मने बहु गाळ आपी! मने मोत ना सौदागर कह्यु! (एक मोर दुसऱ्या मोराकडे चमकून पाहातो. दुसरा मोर घाबरुन दूर जातो.)

मोटाभाई : (बेसावधपणाने) मोत ना सौदागर तो छेल्ला वखत कह्यु हतु! हवे तो आ लोग कहे छे के एने औकात दिखा देंगे!! (मोर पिसारा फुलवण्याच्या बेतात…)

नमोजीभाई : (घायाळ मनाने ) अरे, मी तर एक सिंपल कार्यकर्ता आहे! मारी कोई औकात नथी! हुं तो सेवक छूं!! सेवकनी शुं औकात? ऑ ऑ ऑ…(मोर गोंधळतात. मालक सेवक झाला?)

मोटाभाई : (समजूत घालत) दिल छोट्टु ना करिए! च्यालो, आपडे जईये…

नमोजीभाई : (डोळे पुसत) मौत का सौदागर, जहर की खेती करनेवाळा, नीच जात का, चायवाला…केटली गाळ आपी मने? किती अपमान? इन्सल्ट करण्याचा एक पण चान्स नाय गमावला आ लोगोंने पण मी सगळा सहन केला! कोणासाठी? मारे गुजरातमाटे!! (एखादुसरा मोरही उगीच डोळे पुसल्यासारखं करतो.मोटाभाईदेखील खिशातून रुमाल काढून तयार ठेवतात.)

मोटाभाई : (आदरपूर्वक) तुम्ही होते म्हणून गुजरातचा केटला विकास झ्याला, नमोजीभाई! आपडे विकासना गुजरात मोडेल तो विश्वविख्यात छे!!

नमोजीभाई : (दाणे टाकत) भरुचनी सुविख्यात खारा सेंगजेवा!! ऑ ऑ ऑ…

मोटाभाई : (विनयाने) आज तुमी प्रधानसेवक हाय, म्हणून पडोसी राज्यातून बध्दा उद्योग आपडे गुजरात मां येतात!! आपडे बुलेट ट्रेनपण दौडवानी छे! पछी और उद्योगधंधा पण गुजरात मां लावानुं छे! आवती चुंटणीमां रेकोर्डब्रेक करवाना छे! च्यालो ने, आपडे जईये…

नमोजीभाई : (उत्साहाने) …माझी औकात काढणाऱ्यांना माझी औकात अने त्यांची जग्या दाखवली पाहिजे! आ गुजरात में बनाव्यु छे! च्यालो!!

(मोर मुकाट्याने पांगतात. मोटाभाई समाधानाने खारे शेंगदाणे खिशातून काढत समाधानाने तोंडात टाकतात.)