

Emotional Proposal: Kamalabai's heartfelt letter on Valentine's Day
sakal
प्रिय अहो-
सकल गुणालंकृत सौभाग्यवती कमळाबाईचा मालकांच्या चरणी दंडवत. आज तुम्ही आमचे कुणीही नसला तरी माझ्यासाठी तुम्ही अजूनही ‘मालक’च आहात. दरवर्षी व्हॅलेंटाइन डे जवळ आला की माझे मन कातर कातर होते. कावरे बावरे होते. संध्याकाळी उदास वाटू लागते. शेरोशायरी सुचू लागते. कालच संध्याकाळी साडेसातनंतर उगीच सोडा आणि बर्फ पीत बसले होते, तेव्हा मन दु:खाने गीत गात होते :
मेरे किस्मत में तू नहीं शायद
मैं तेरा इंतजार करती हूं
मैं तुझे तब भी प्यार करती थी,
मैं तुझे अब भी प्यार करती हूं…
…राग आला का? माझा राग आला की गीत हिंदीत आहे म्हणून रागावलात? जगात अनेक प्रसिद्ध युगुले होऊन गेली. हीर रांझा, लैला मजनू, रोमिओ ज्युलिएट, वासू-सपना, तशीच आपलीही जोडी होती. पण मेली दृष्ट लागली!