
बेटा : (अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (कपाळ चोळत) हं!
बेटा : (आल्या आल्या उत्साहात) माझा लेख वाचलास की नाही? जाम गाजतोय!
मम्मामॅडम : (कौतुकानं) तू लेखबिख लिहायला लागलास? कम्मालच झाली! शाब्बास!!
बेटा : (हाताची घडी घालून हवेत बघत) मी चांगला लेखक आणि समीक्षक आहे, याचा साक्षात्कार मला नुकताच झाला!! माझा लेख वाच, मग कळेल!! आज पक्षकार्यालयात मला भेटलेला प्रत्येक जण सांगत होता, ‘काय अप्रतिम लिहिता तुम्ही? व्वा!!