घन कोसळतो अनिवारत्यां नसे अंत ना पारसावळ्या, बुडाला गावतू आवर ना व्यापार.तू चित्रकार दैन्याचाआकांती रंग उधळशीकरड्यावर काही काळेअशुभाचे चित्र ऊराशी.रिमझिमत्या झरती धाराते नृत्य उतरते पायीसावळ्या, थांब रे आतापैंजणही थकून जाईवस्तीतुनि शिरले पाणीदारिद्र्य तरंगत राहेतू शहाजोग वर स्वामीघनतमी परीक्षा पाहे.छपराला सहस्त्र भोकेत्या खाली टोप तपेलीतुज दया का नये क्रूरा,ओतशी कितीस पखालीबघ, वाहून गेली वस्तीपाण्यात बुडाले श्वाससावळ्या, जाय माघारीकसली ही अघोर प्यास.उद्ध्वस्त मनाच्या भिंतीओल्यात कोरडी कायाकाठावर अर्धा जागतकुणी पेंगतो वायाएरवी गटारासंगेरमलेली गावभवानीही नदी सोडुनि लाजउसळते घरोघर पाणी.फुंफाटत आली दारीती तोडित फोडित भिंतीसावळ्या, करांगुळी दे रेपर्वत घे माथ्यावरतीतीरांचे सोडुनि काचही नदी घुसे नगरातना चारित्र्याचे भानना लाजायाची बात.सुस्ताच्या क्षितीजामागेअस्ताचे आहे गावपैलाड धुक्याच्या पोटीमी वल्हवतो ही नावहे मेघ किती आसक्तधुसमळती अंगांगाससावळ्या, सोड रे आतासृष्टीस घेऊ दे श्वास.सृष्टीचे भिजले अंगओलेती उष्ण उभारभिजलेल्या देहालागीही पुन्हा भिजवते धारही कणाकणाची कायाधुसमळते वेड्यावाणीती भीड सोडुनि गातेदु:खाची आर्त विराणी.बरसून किती बरसावेतुज हद्द नाही का ठावी?सावळ्या, हट्ट कुठला हाजगण्याची माती व्हावी?सांभाळीत किडके मिडकेहे चंद्रमौळी आयुष्यहे पहा, चालले वाहुनिबघ किती विदारक दृश्य.मी एकुटवाणा आहे,तू तसाच असशी अकेलासावळ्या, थांबवी आतापाऊस तुझा अलबेला!वृक्षाची जीर्णशी सालराखुनी ठेवते ओल,ओल्याशा पानवळ्याशीपाण्याचे अनवट बोल.बेहाय कोसळे पाणीमाझे न यातले काही,जणु नभ हे झटके हातजणू देणेघेणे नाहीहा दिवस आंधळा होता,आणखी पांगळा झालासडकेशी तिष्ठत होताचिडलेला ओला ओला.कुणी उंच उभारुनि टाचाकवटाळुनि दोन्ही हातीमेघांना चुंबुनि घेतोआत्म्याची होते माती.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.