The Struggle of Tracking Party Shifts

The Struggle of Tracking Party Shifts

sakal

ढिंग टांग - मतदान कसे करावे..?

बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर 'मतदान नक्की कोणाला आणि कसे करावे' याचे उपरोधिक दर्शन घडवणारा हा लेख मतदारांच्या मनातील गोंधळावर नेमके बोट ठेवतो.
Published on

संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य मतदाराने मतदान करणे ही एक अत्यावश्यक बाब आहे. या दिवशी संभवत: मतदारांस आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सुटी दिली जाते, यातच मतदानाचे महत्व स्पष्ट होते. मतदानाचे दिशी सकाळी उठावे, हातातले चिटकोरे घेऊन नियुक्त केंद्रात जाऊन रांग धरावी. बोट आणि मतदार ओळखपत्र पुढे करावे. योग्य ठिकाणी शाईलेपन झाले की त्या समधुर लोकशाही ध्वनी काढणाऱ्या यंत्रासमोर (आडोश्याला) उभे राहून आपल्याला हवे ते बटण दाबावे! बाहेर पडून एक सेल्फी घ्यावी, आणि ती तात्काळ समाजमाध्यमांवर पोष्टावी. झाले मतदान!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com