
ढिंग टांग
इंटरपोलच्या धर्तीवर भारतपोलची स्थापना करुन केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा ऊर्फ मोटाभाई यांनी जोरदार कुरघोडी केली असून अधोविश्वाचे धाबे दणाणले आहे. आता कुठल्याही गुन्हेगाराला भारतात गुन्हे करुन परदेशी पळून जाणे केवळ अशक्य बनले आहे. असे केल्यास सदरील गुन्हेगारास भारतपोलचे सक्षम अधिकारी फरफटत परत आणून अरबी समुद्रात बुडवणार ही काळ्या फत्तरावरची रेघ!