dhing tang
sakal
ज्याची इतके दिवस वाट पाहिली, तो दिवस अखेर उजाडला. पहाटे उठलो. स्नान केले. दिवाळीच्या टायमाला मोती साबण आणला होता, त्याची वडी अजून बरीचशी शिल्लक आहे. तरीही नव्या सुगंधी साबणाचा कागद काढला. अंगास उटणे फासडले, आणि सुंदरसे स्नान केले.
त्यापूर्वी गुळगुळीत दाढी करुन घेतली. एक मन म्हणे, हल्ली दाढी राजकारणात चालते. दुसरे मन म्हणे, छे, आपणच आपली गुळगुळीत केलेली बरी! शेवटी हो-ना करता करता दुसऱ्या मनाचे ऐकले.