dhing tangsakal
satirical-news
ढिंग टांग : खाता अपना अपना..!
कुणी आहे का इकडं? की आम्हीच पहिले!! अर्जंट मीटिंग आहे, असा मेसेज आला होता, म्हणून आलोय!
स्थळ : अज्ञात. वेळ : अज्ञात. पात्रे : ट्रिपल इंजिन!
दादासाहेब : (अंधाऱ्या खोलीत दबकत येत) कुणी आहे का इकडं? की आम्हीच पहिले!! अर्जंट मीटिंग आहे, असा मेसेज आला होता, म्हणून आलोय!
भाईसाहेब : (अंधारातून) मी आधीच येऊन बसलोय! या!! आढावा बैठक आहे म्हणे!
दादासाहेब : (संशयानं) कसला आढावा? आमच्या अर्थ खात्यात आढावा बिढावा काही नसतं! फक्त वाढावा असतो!!
नानासाहेब : (घाईघाईने येऊन खोलीतला दिवा लावत) सॉरी, अडीच मिनिटं उशीर झाला! पण एक कार्यक्रम होता, उरकून आलो!! हल्ली फार धावपळ होते…