dhing tang
sakal
स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे सोसायटी. वेळ : प्राइम टाइम.
चि. विक्रमादित्य : (घाईघाईने दरवाजा ढकलून आत येत) हाय देअर, बॅब्स...!
उधोजीसाहेब : (तयार होता होता) दारावर टकटक न करता परवानगीशिवाय खोलीत शिरणं हे असभ्यपणाचं आहे!
विक्रमादित्य : (घाईघाईने) बॅब्स, धोका...! आधी खिडकी बंद करा!!
उधोजीसाहेब : (खिडकी बंद करु लागत) तरी मी सांगत होतो, उंदिर फार झाले आहेत या घरात! शिंचे पाइपावरुन चढून येतात!!