महाराष्ट्रासमोर आज अनेक भयंकर अक्राळविक्राळ समस्या उभ्या आहेत. त्यांची तड लावणे तितके सोपे नाही. समस्या एकट्या येत नाहीत, झुंडीने येतात. या समस्यांमुळे महाराष्ट्रातील जनता गांजलेली आहे. तथापि, सांगावयास आनंद होतो की, या समस्यांवर रामबाण उपाय सुचवणारे ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्याचपाशी आहेत. लोकांना छळणाऱ्या या समस्यारुपी प्रश्नांची उकल आमचे अतिथी मार्गदर्शक माननीय नानासाहेब फडणवीस अतिशय सहजपणे करुन देतात. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स) तुमचे, उत्तरे मात्र नानासाहेबांची :