dhing tang
sakal
सर्व सहकाऱ्यांसाठी- आपणांस हे विदित असेलच की ( प्लीज नोट : माहीत असणे वेगळे आणि विदित असणे वेगळे!) सध्या आपले सरकार कर्जाच्या कमळात अडकलेल्या भुंग्याप्रमाणे आहे. (संदर्भ : ‘कवी प्रभाकर भ्रमर गुंतला कर्जाच्या कमळात’ या पुराण्या काव्यपंक्ती.) आजमितीस नऊ लाख कोटींचे कर्ज शिरावर असून कर्जाची परतफेड करण्यासाठीही नवे कर्ज काढावे लागत आहे.