

Grassroots Dialogue and Youth Activism in Mumbai
Sakal
सदू आणि दादू ही चुलत भावंडांची जोडी विश्वविख्यात आहे. सदूने बंडाचा (रंगबिरंगी) झेंडा हाती उंच धरिला असून दादूच्या शाब्दिक कोट्या आणि टोमण्यांमुळे महाराष्ट्र पेटून उठला आहे. सदू आणि दादू यांचा संवाद चालू राहीलच. परंतु, आता नवी विटी, नवे राज्य या न्यायाने चुलत भावंडांची नवी जोडी पेश करणे गरजेचे झाले आहे. ही जोडी भविष्यातील महाराष्ट्र ढवळून काढेल, आणि मराठी माणसाचा मुंबईतील ( पक्षी : दादर-वांद्रे परिसर) आवाज बुलंद करतील, असा विश्वास आहे. पेश है... नवी जोडी, नवा संवाद :
आदू : (अनुभवी आवाजात) हाय देअर…व्हॉट्स अप?
अमू : (चुकून फोन लागल्यागत) हाय! फोन मी केलाय की तुम्ही? कोण बोलतंय?
आदू : (सहजगत्या) मी बांदऱ्याचा आदू... ओळखलं ना? गेल्या दोन महिन्यात सात वेळा भेटलो होतो...
अमू : (ओळख पटून) आदूदादा, कसा आहेस? लाँग टाइम नो सी?