जास्तीचा कांदा घालून सजवलेल्यामिसळीत चमचा खुपसून त्यानेजडशीळ आवाजात म्हटले-‘‘केवढा रे पाऊस, छे, छे,झोपलेली शेतशिवारं, टाहो फोडणारे शेतकरी,धाय मोकलणाऱ्या बायाबापड्या,बघवत नाही अगदी!’’ .‘‘मी तर टीव्हीच बंद केला, राव!भयानक परिस्थिती आहे सगळी,आता भाज्यांचे भाव कसेभडकतील, बघच तू…रस्सा आण रे जल्दी!’’.शेतकऱ्यांच्या टाहोच्या फीडलाउत्तम टीआरपी आल्याचा रिपोर्टसंगणकाच्या पडद्यावर बघूनवाहिनी प्रमुखाने टीम लीडरचीथोपटली पाठ, आणि म्हटले,‘‘अजून तीन दिवस चालवूयाओला दुष्काळ, पण पोलिटिकलसुध्दासायमलटेनिअसली चालू ठेवा,.इलेक्शनच्या कव्हरेजसाठीमीटिंगला बसलं पाहिजे आपल्याला!सध्या पावसानं हात दिला आहे,नंतरचं प्लानिंग केलं पाहिजे!’’एवढं बोलून तो सहजच गाणे गुणगुणतऑफिसातल्या इन्स्टन्ट कॉफीयंत्रासमोररिकामा कागदी गिलास घेऊनउभा राहिला….कॅमेरामन अडकवण्यापेक्षामोजो याने की मोबाइल जर्नलिझम करा,ही सूचना द्यायची राहिली, हे लक्षात येऊनतत्परतेनं त्याने मेसेज टाइप करुनग्रुपवर टाकला…सब टीआरपी का खेल है बॉस!.रात्री उशीरा झोपून सकाळी लौकरउठणाऱ्या महानेत्याने चहाच्या कपाशीठेवलेल्या वर्तमानपत्राच्या कात्रणांकडेढुंकूनही न बघता पीएसला निक्षून सांगितलं,‘‘सोलापूर साईड आणि मराठवाडा साईडलापाठवलेल्या टीमला ताबडतोब संपर्क करा,मदतीची किती किटं जमली?अरे, फक्त तीनशे?.एवढ्यानं काय होणार? त्या अमक्यालालावा फोन, म्हणावं, दहा हजार किटंताबडतोब पाठवायची आहेत…सीएससाहेबांकडून एनडीआरेफच्याप्रपोजलचा ड्राफ्ट दहाच्या आत हवाय,असं सांगा, नुसते झोपा काढतात लेकाचे,पक्षाची मदत वेगळी, सरकारी वेगळी!.आणि हो, त्या तमक्या वाहिनीच्याफलाण्या रिपोर्टरला घ्या विमानातनिघायला हवं आता!एवढे बोलून महानेत्यानेसफरचंदाची स्मूथी, बीटरुटचा ज्यूस,दीडशे ग्रॅम ओट्स आणि ग्रीन टीएवढीच माफक न्याहरी घेतली,आणि तडफेने तो म्हणाला,‘‘चला, निघू या!’’.डोळ्यात राखेचा तोबरा भरुनबधीर चेहऱ्यानं, लुळ्यापांगळ्या मोहऱ्यानंहातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीकभरल्या गढूळ पाण्यात साफ झोपलेलंटक लावून बघत बसलेल्या महादूनंथुंकी उडवत आभाळातल्या ढगांनादिली एक कचकचीत जहरी शिवी,.तेवढ्यात ऐकू आलेल्या घरघराटानंतरलांबवर पांढऱ्या मोटारींचे ठिपके,क्षितीजावर ठळक होत गेले,पोलिस जिपांचे आणि शिट्यांचेफुरफुराट दुमदुमले आसमंतात,बांधावर धावून आलेल्यानेत्यांच्या पुढेमागे कॅमेऱ्यांचीदुर्दम्य लगबग, शुभ्र बगळ्यांचाथवा उतरावा शिवारात,.तसा या दयाघनांचा दौरा.…कसाबसा पुराच्या पाण्यात वाचूनघराकडं परतलेला परसदारी बांधलेलाहडकुळा बैल कडब्याविना उभा होता,तसाच…अगदी तसाच…महादूबसला होता तिष्ठत..विनास्वप्न. विनाअन्न. विनापीक.महादू त्याला म्हणाला, ‘‘लाजमोड्या,तू आणि मी…दोघंच उरलो.बाकी लवाजमा बांधाच्या पल्याडचाच.प्याकेज आणि तुझ्या-माझ्यात फक्तएका बांधाचं अंतर हाय!’’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.