

Historical Context of MNS Formation
Sakal
प्रिय दादोजी, जय महाराष्ट्र! आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, असा आहे. २४ डिसेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात कायमस्वरुपी राहील. कां की या दिवशी दुभंगलेली दोन मराठी मने जुळली. एकसंध झाली. पुन्हा उभी राहिली…
सकाळी लौकर उठलो. यापुढे रोज लौकर उठणार आहे. आजपासून ठरवले आहे, रोज स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे. त्यांच्या अंगावर ओरडायचे नाही, असेही ठरवले आहे. यापुढे सगळे नीट करायचे, बरे का, दादूराया!