

Political Showdown at Asiatic Society
Sakal
न अस्कार! दोन विद्वानांमधली वादचर्चा इतकी ताणली गेली की, शेवटी कुस्ती खेळून निकाल लावावा लागल्याची एक पुराणकथा ऐकली होती. कुस्तीत कुठला विद्वान जिंकला,आणि कुठला लंगडत गेला,हे इतिहासास ठाऊक नाही.( ही कथा कुठे ऐकली होती, हे विचारु नका.मला म्हन्त्यात पुण्याची सरोज!)प्राचीन काळी रोमन साम्राज्यातही वादचर्चा अनिर्णित राहिली तर तुंबळ हाणामारी होत असे म्हणे. पण कलियुगात मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचं तसंच काहीसं होतंय, हे बघून माझ्या हळव्या मनाला सहस्त्र वेदना होतायत. डाव्या-उजव्या गटांमध्ये एशियाटिक सोसायटीची निवडणूक होतेय.