

Mumbai politics
sakal
सदू : (घाईघाईत फोन फिरवत) म्यांव म्यांव...!
दादू : (सांकेतिक प्रतिसाद देत) गुर्रर्र...गुर्रर्र!
सदू : (सावधगिरीनं) तूच आहेस ना दादूराया?
दादू : (इकडे-तिकडे बघत) होय मीच! पण तुम्ही कोण?
सदू : (कपाळावर हात मारत) हो रे बाबा! मी सदूच बोलतोय! पण आपलं फोनवर सांकेतिक बोलायचं ठरलं होतं ना? मी म्यांव म्यांव करायचं, तू भू भू करायचं! दोन्ही जुळलं की, पुढे बोलायचं... मग गुर्र गुर्र का केलंस?
दादू : (गोंधळून) अस्सं होय! मी परवलीचा शब्दच विसरलो होतो... सॉरी!
सदू : (धोरणीपणाने) ते जाऊ दे! महायुतीचा वचननामा ऐकलास ना?
दादू : (दर्पोक्तीनं) शी! मला तर शिसारी आली! असले छप्पन वचननामे आले तरी आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही! या वेळी काहीही झालं तरी मुंबईकर मराठी माणूस आपल्या ‘ब्रँड’च्या पाठीशीच उभा राहणार आहे, बघशीलच तू!